Goa Police: सेक्स रॅकेटमध्ये गुंतलेल्या हवालदाराची तडकाफडकी बदली

या प्रकरणात एका उपनिरीक्षकासह एका पोलिस शिपायाचाही सहभाग असल्याचे गुपित आता बाहेर आले आहे.
Goa Police
Goa PoliceDainik Gomantak

Goa Police हणजूण येथील आंतरराष्ट्रीय सेक्स रॅकेटचा शुक्रवारी पोलिसांनी पर्दाफाश केला. या सेक्स रॅकेटमध्ये गुंतलेल्या संशयितांना संरक्षण देणारा पोलिस हवालदार अनिल पिळगावकर याची तडकाफडकी बदली करत पोलिस खात्याने त्याला पणजीतील मुख्यालयाचा दरवाजा दाखविला आहे.

२०१३ म्हणजेच दहा वर्षांपासून पिळगावकर हा हणजूण पोलिस स्थानकात असल्याने त्याने या परिसरात चांगलेच बस्तान बसविल्याची चर्चा आहे. सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे, पिळगावकरची कोलवाळ व आगशी पोलिस स्थानकात बदली झाली होती;

Goa Police
37th National Games: अवघ्या दीड महिन्यांवर राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा; आयोजनातली अनागोंदी उघड, 'ही' महत्वाची कामे प्रलंबित

परंतु हणजूण पोलिस स्थानकातून त्याला रिलिव्ह करण्यात आले नव्हते. अखेर सेक्स रॅकेटला पाठिंबा देणारा पिळगावकरच असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्याला पणजीतील मुख्यालयाचा रस्ता दाखविला.

अनेकांचा हात

या प्रकरणात एका उपनिरीक्षकासह एका पोलिस शिपायाचाही सहभाग असल्याचे गुपित आता बाहेर आले आहे. लवकरच ‘ते’ मासेही गळाला लागतील, असे बोलले जात आहे.

तथापि, ‘प्रोटेक्शन मनी’ घेऊन संशयितांचे संरक्षण करणाऱ्यांची पोलिस खाते केवळ बदलीच करणार, की इतर 13 भ्रष्ट पोलिस कर्मचाऱ्यांना ज्याप्रमाणे बडतर्फ केले, तसे पिळगावकर यालाही बडतर्फ करणार, हे स्पष्ट होईल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com