World Oceans Day:जागतिक महासागर दिनानिमित्ताने 8 जून रोजी मिरामार समुद्र किनाऱ्यावर एक प्रभावी जनजागृती मोहीम आयोजित करण्यात आली होती. प्लास्टिक प्रदूषणामुळे पर्यावरण आणि मानवी आरोग्यावर होणाऱ्या गंभीर परिणामांकडे या मोहिमेद्वारे लक्ष वेधण्यात आले. अय्या वेस्ट मॅनेजमेंट, वन अर्थ फाउंडेशन आणि धेंपे कॉलेज ऑफ आर्ट अँड सायन्सच्या विद्यार्थ्यांचा ‘उजवाड’ गट यांच्या संयुक्त प्रयत्नाने ही मोहीम आखण्यात आली होती.
समुद्री लाटांच्या गंभीर आवाजात विद्यार्थ्यांचा सामुदायिक आवाज, ते सादर करत असलेल्या पथनाट्याद्वारे भर घालत होता आणि किनाऱ्यावरील पर्यटक आणि स्थानिकांचे लक्ष वेधून घेत होता. प्रभावी दृश्याबंध आणि संवेदनशील आशय यातून विद्यार्थ्यांनी एकेरी वापरात येणारे प्लास्टिकचे विनाशकारी परिणाम आणि रासायनिक प्रदूषणामुळे आपल्या पाणवठ्यांमध्ये घडून येणारे वाईट बदल प्रभावीपणे लोकांसमोर सादर केले.
या समस्या केवळ सागरी जीवसृष्टीलाच धोका उत्पन्न करतात असे नाही तर मानवी आरोग्य आणि स्थानिक मच्छीमारांच्या जीवनमानावरही त्याचा गंभीर परिणाम होतो हे विद्यार्थ्यांनी आपल्या पथनाट्यातून दाखवून दिले. महासागराचे आरोग्य जमिनीवरील जीवनाशी कसे निगडित आहे हे त्यांच्या सादरीकरणातून स्पष्ट होत होते. मनापासून व्यक्त होत असलेल्या विद्यार्थ्यांच्या विचारांना तिथल्या अनेक प्रेक्षकांनी प्रतिसाद दिला आणि त्यांचे कौतुक केले.
पथनाट्याच्या सादरीकरणानंतर समुद्रकिनार्यावर स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत भाग घेतलेल्या सहभागींनी कागद, काचा आणि प्लास्टिक यांचा सुमारे 35 किलोग्रॅमपेक्षा अधिक कचरा गोळा केला. विद्यार्थी करत असलेले काम पाहून पर्यटकांनी देखील या कामात आपला उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. तो पर्यावरणीय कार्यक्रम आपोआपच एकता आणि कृतीचा भावनिक आणि भक्कम संदेश देणारी एक कृती बनली होती. हा सामुदायिक भावनेचा, युवा नेतृत्वाचा आणि स्वच्छ आणि निरोगी भविष्यासाठी तो कार्यक्रम आशेचा उत्सव होता.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.