Sasashti Mental Health : मानसिक आरोग्य विकार जडलेल्यांची काळजी घेणाऱ्यांसाठी मडगाव दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात यासंदर्भात प्रशिक्षण देण्यात आले. मानसिक विकाराच्या रुग्णांची काळजी कशी घ्यावी याबद्दलची माहिती यावेळी देण्यात आली. सध्या भारतात 20 टक्के नागरिक मानसिक विकार रुग्ण असून, जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार, या वर्षाच्या अखेरपर्यंत अशा रुग्णांची संख्या वाढणार आहे.
जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे की, भारतात 5.6 कोटी नागरिक नैराश्येत तर 3.8 कोटी नागरिक चिंतेचे विकारी आहेत. या रुग्णांपैकी 70 ते 80 टक्के रुग्णांची काळजी घेतली जात नाही. त्यामुळे राष्ट्रीय आरोग्य केंद्रातर्फे भारतात मानसिक आरोग्य विकार रुग्णांची काळजी घेणाऱ्यांना शिक्षित करण्यासाठी प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित केल्या जात आहेत. त्यापैकी एक दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात आयोजित करण्यात आली होती.
या वेळी मानसशास्त्रज्ञ डॉ. पल्लवी ढाकणे यांच्या नेतृत्वाखाली परिचारिका व आयपीएचबी महाविद्यालयाचे साहाय्यक प्रोफेसर विठोबा म्हालकर यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळाचे वैद्यकीय निरीक्षक डॉ. राजेंद्र बोरकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
शिबिरात यांचा सहभाग
मानसिक रुग्णांना शारीरिकदृष्ट्या कसे तंदुरुस्त ठेवता येते, याबद्दलचे मार्गदर्शन त्यांची काळजी घेणाऱ्यांना करण्यात आले. या प्रशिक्षण शिबिरात वैद्यकीय व परिचारिका मिळून 150 कर्मचाऱ्यांनी व इतरांनी भाग घेतला. यात मानसशास्त्रज्ञ, क्लिनिकल सायकोलॉजिस्ट, परिचारिका, सायकीयाट्रिक सामाजिक कर्मचारी व केज रजिस्ट्री साहाय्यकांचा समावेश होता.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.