Mega Health Camp : केंद्राच्या मदतीने आरोग्य क्षेत्राचा कायापालट; मंत्री राणे

दाबे-सत्तरी येथे भव्‍य आरोग्य शिबिर; वायंगिणीत सौर विजेची सोय करण्यासाठी प्रयत्नशील
Mega Health Camp held at Mauxi Panchayat
Mega Health Camp held at Mauxi PanchayatDainik Gomantak
Published on
Updated on

म्हाऊस ग्रामपंचायत क्षेत्र अत्यंत ग्रामीण आहे. दुर्गम असलेल्या एका वायंगिणी गावात सौर प्रकल्‍पाद्वारे विजेची सोय करण्यासाठी मी कार्यरत राहणार आहे. लोकांना औषधे मोफत दिली जातात. मधुमेहींना मोफत इन्सुलीन देण्‍यात येते.

विविध योजना मार्गी लावल्‍या जात आहेत. लोकांचे जीवनमान उंचावण्‍यासाठी काम करीत आहे. महिलांच्या आरोग्यावर जास्त भर देण्‍यात येतोय. केंद्राच्या सहकार्याने राज्‍याच्‍या आरोग्य क्षेत्राचा कायापालट करण्‍यात येईल, असे प्रतिपादन आरोग्‍यमंत्री विश्‍‍वजीत राणे यांनी केले.

आरोग्य सेवा संचालनालय पणजी, गोवा वैद्यकीय महाविद्यालय बांबोळी, एएसजीआय इस्पितळ व वाळपई सरकारी आरोग्य केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने दाबे-सत्तरी येथे सरकारी विद्यालयाच्या प्रांगणात आज रविवारी आयोजित भव्‍य आरोग्य शिबिरात राणे बोलत होते.

Mega Health Camp held at Mauxi Panchayat
Women In Power : महिलांच्या उत्कर्षासाठी सरकार कटिबद्ध : मंत्री विश्‍वजीत राणे

यावेळी पर्येच्या आमदार दिव्या राणे, गोमेकॉचे डीन डॉ. शिवानंद बांदेकर, वाळपई सरकारी आरोग्य केंद्राचे आरोग्यधिकारी डॉ. विकास नाईक, डॉ. श्याम काणकोणकर, डॉ. वैभव गाडगीळ, अकीब शेख, संयोजक विनोद शिंदे, आरोग्य संचालका डॉ. गीता काकोडकर, डॉ. गीता देशमुख, डॉ. शॉन, केदार रायकर, प्रशांत सूर्यवंशी, म्हाऊस सरपंच सोमनाथ काळे, उपसरपंच राधिका सावंत, दाबे शाळेच्या मुख्याध्यापिका रोशन पैंगीणकर, केरी जिल्‍हा पंचायत सदस्‍य देवयानी गावस, अमिता कामत, प्रीती गावकर, गुरुदास गावस, कांता गावकर, सयाजी सावंत, पंचसदस्य उपस्थित होते.

रामा गावस, योगेश गावस, रोहित गावस, आतिष गावस, सागर गावस, बिरो काळे, अजय गावस, देवगो गावकर, किरण गावकर, पुष्पराज गावकर आदींनी मान्‍यवरांना पुष्पगुच्छ प्रदान केले. सरपंच सोमनाथ काळे यांनी स्वागत केले. उदय सावंत यांनी सूत्रसंचालन तर डॉ. विकास नाईक यांनी आभार मानले. या शिबिराला लोकांकडून उदंड प्रतिसाद मिळाला.

Mega Health Camp held at Mauxi Panchayat
Digital India : होंडा तलाठी कार्यालयातील संगणक नादुरूस्त

नर्सिंग कॉलेज उभारण्‍यासाठी प्रयत्‍न : विश्‍‍वजीत

केंद्राच्या माध्यमातून राज्यात नर्सिंग कॉलेजसाठी प्रयत्न करण्‍यात येतील. तसेच नवीन मेडिकल कॉलेजसाठीही प्रयत्न केले जातील. सामान्य जनतेला मोफत आरोग्‍य सेवा पुरविल्‍या जातील. सत्तरीच्‍या ग्रामीण भागात पाणी पुरविण्यासाठी दाबोस जलप्रकल्पाचा विस्तार केला जाणार आहे.

झर्मे गावातील लोकांबरोबर माझ्‍या वडिलांनी वेगळे नाते प्रस्‍थापित केले आहे. तेथे चांगल्‍या प्रकारे रोजगार देण्‍यात आलाय. चरावणे गावातही रोजगाराच्‍या संधी उपलब्‍ध करून दिल्‍या जातील, असे मंत्री राणे म्‍हणाले. केंद्राच्या मदतीने आरोग्य क्षेत्राचा कायापालट करणार आहे.

कॅन्सर रुग्णांसाठी केमोथेरपी खूपच खर्चिक बाब असते. ती मोफत देण्यासाठी राज्यात कॅन्सर विभाग हाती घेतला जाईल. ग्रामीण प्राथमिक आरोग्य केंद्रांचा दर्जाही वाढविला जाईल, असेही त्‍यांनी स्‍पष्‍ट केले.

"ग्रामीण भागात गेल्‍या दीड महिन्‍यापासून आरोग्‍य शिबिरे सुरू आहेत. तेथील लोकांना आरोग्‍य सेवा, सुविधा मिळायला हव्यात. आरोग्‍यमंत्री राणे जनतेच्‍या भल्‍यासाठी सदैव कार्यरत आहेत. ग्रामीण लोकांना चांगल्‍या सुविधा देण्यासाठी काम करीत आहेत. आरएमडी केंद्रातही रुग्णवाहिका ठेवलेल्या आहेत. केंद्राच्या सहकार्याने गोव्‍याच्‍या आरोग्‍य क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणले जातील."

- डॉ. दिव्‍या राणे, पर्येच्‍या आमदार

"सत्तरीच्‍या दाबे गावात आरोग्य शिबिर घेणे गरजेचे होते. २५ डॉक्टरांची फौज येथे आणली गेली. वाळपईत दोन दिवस बांबोळीची सॅटेलाईट सेवा सुरू ठेवली आहे. त्याचा लाभ सत्तरीवासीयांनी घ्‍यावा. शिबिरात लाभार्थींना पहिले प्राधान्य बांबोळीत दिले जाईल. लोकांना दर्जात्‍मक आरोग्‍य सुविधा देण्‍यावर आमचा भर आहे. त्‍यासाठी जनतेचेही सहकार्य अपेक्षित आहे."

- शिवानंद बांदेकर, गोमेकॉचे डीन

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com