World Elder Abuse Awareness Day Gomantak Digital Team
गोवा

World Elder Abuse Awareness Day : जागृती अहवाल जाहीर; राज्यात 55 टक्के ज्येष्ठांवर होतो अत्याचार

केवळ दोन टक्के ज्येष्ठ नागरिकांना स्वयंसेवी संस्थांकडून मदत मिळते, असे नुकत्याच घोषित अत्याचार जागृती अहवालात म्हटले आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Salcete : गोव्यात 55 टक्के ज्येष्ठ नागरीकांवर अत्याचार केला जातो. त्यातील 15 टक्के ज्येष्ठ नागरिकांना अनादराने वागणूक दिली जाते. त्यांना शिवीगाळ केली जाते. ज्या ज्येष्ठ नागरिकांवर अत्याचार होतात त्यातील 45 टक्के नागरिक अत्याचार मुकाटपणे सहन करतात. केवळ दोन टक्के ज्येष्ठ नागरिकांना स्वयंसेवी संस्थांकडून मदत मिळते, असे नुकत्याच घोषित अत्याचार जागृती अहवालात म्हटले आहे.

अखिल गोवा ज्येष्ठ नागरिक महासंघ व हेल्प एज इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी जागतिक वृद्ध अत्याचार जागरूकता दिवस साजरा करण्यात आला. त्यावेळी प्रोव्हेदोरियाचे संचालक विनायक वळवईकर, हेल्प एज इंडियाचे गोवा प्रतिनिधी दत्तप्रसाद पावसकर यांच्या हस्ते ज्येष्ठ नागरिकांसाठीचा अत्याचार जागृती अहवाल जाहीर करण्यात आला.या अहवालात गोव्यातील ज्येष्ठ नागरिकांना मिळणाऱ्या वागणुकीचा आकडेवारीसह उल्लेख करण्यात आला आहे.

देशात 52 टक्के ज्येष्ठ नागरिक महिलांवर 40 टक्के अत्याचार मुलांकडून, 31 टक्के इतर कुटुंबीयांकडून तर 27 टक्के अत्याचार सुनांकडून होत असतो. भारतात जवळ जवळ 66 टक्के ज्येष्ठ नागरिक महिला आर्थिक दृष्ट्या कमकुवत असल्याचे, म्हणजे त्यांच्याकडे मालमत्ता नसल्याचे अहवालात म्हटले आहे.

जास्तीत जास्त ज्येष्ठ नागरीकांनी ज्येष्ठ नागरीक संघटनेचे सदस्य व्हावेत असे आवाहन दत्तप्रसाद पावसकर यानी केले. दरम्यान ज्येष्ठांना पोलिसांकडून मिळणाऱ्या वागणुकीवर अखिल गोवा ज्येष्ठ नागरिक संघटनेने नाराजी व्यक्त केली. न्यायासाठी पोलिस ज्येष्ठ नागरीकांना न्यायालयात जाण्यास भाग पाडतात, असे डायगो डिकॉस्ता यांनी यावेळी सांगितले.

ज्येष्ठ नागरीकांवरील अत्याचाराबद्दल जी अहवालात आकडेवारी व माहिती दिली आहे, ती गंभीर व चिंताजनक बाब आहे. भावनिक अत्याचार शारिरीक अत्याचारापेक्षा जास्त गंभीर असतात. त्यामुळे सर्वांनी ज्येष्ठ नागरिकांचा आदर केला पाहिजे.

-विनोद प्रभुदेसाई, ज्येष्ठ नागरिक

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT