Salcete Agriculture : गोव्यातील शेतकऱ्यांसाठी ‘ई-नाम’ ट्रेडिंग पोर्टल सुरू

प्रकाश वेळीप यांची माहिती : बाणावलीत 19 पासून राष्ट्रीय कृषी परिषद
National Board of Agricultural Marketing
National Board of Agricultural MarketingGomantak Digital Team
Published on
Updated on

Salcete Agriculture : ‘ई-नाम’ पोर्टलची देशातील शेतकऱ्यांमध्ये जागृती व प्रसार करण्यासाठी राष्ट्रीय कृषी विपणन मंडळाने (कोसंब) गोवा कृषी उत्पन्न आणि पशुधन विपणनाच्या सहकार्याने 19, 20 व 21 जून असे तीन दिवस बाणावलीतील हॉटेल फॉर्चुनमध्ये राष्ट्रीय कृषी परिषदेचे आयोजन केले आहे, अशी माहिती गोवा विपणनाचे अध्यक्ष प्रकाश वेळीप व सचिव सत्यवान देसाई यांनी आज मडगावात घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.

मुख्य कार्यक्रम 20 जून रोजी सकाळी 10 वाजता होणार आहे. परिषदेचे उद्‍घाटन गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते होणार असून कृषी मंत्री रवी नाईक उपस्थित राहणार आहेत. शिवाय राष्ट्रीय कृषि विपणन मंडळाचे (कोसंब) चेअरमन तथा उत्तराखंडचे कृषीमंत्री गणेश जोशीही उपस्थित राहणार आहेत.

या परिषदेला देशातील विविध राज्यांतील कृषि विपणनाचे 40 पदाधिकारी, अधिकारी उपस्थित राहणार आहेत. शिवाय गोव्यातील कृषि खात्याचे अधिकारी, शेतकऱ्यांनाही या परिषदेला आमंत्रित करण्यात आले आहे.

National Board of Agricultural Marketing
Salcete News : कुंकळ्ळीचे बंड अभ्यासक्रमात; ‘चिफ्टन्स मेमोरियल’ला आनंद

उदघाटन सोहळ्यानंतर कोसंबचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. जे एस यादव, ई-नाम ट्रेडिंग पोर्टलचे तज्ञ मनोज द्विवेदी, कृषी तज्ञ दुष्यंत त्यागी, केंद्र सरकारचे कृषी सल्लागार डॉ. परशुराम पाटील हे उपस्थित प्रतिनिधींना ई- नाम ट्रेडिंग पोर्टलच्या संदर्भात प्रात्यक्षिकांसह सविस्तर माहिती देऊन मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहिती प्रकाश वेळीप यांनी दिली.

National Board of Agricultural Marketing
Salcete News : भाजप एसटी मोर्चातर्फे राष्ट्रपती दौपदी मुर्मू यांचे अभिनंदन

घरबसल्या शेतकरी विकू शकतो शेतमाल

देशातील शेतकऱ्यांना आपल्या गावातून इतर राज्यातील शेतकऱ्यांना आपल्या कृषी उत्पादनाची विक्री करण्यासाठी सुविधा उपलब्ध व्हावी, म्हणून केंद्र सरकारने ‘ई-नाम’ (नॅशनल ॲग्रीकल्चर मार्केट) या इलेक्ट्रॉनिक ट्रेडिंग पोर्टल सुरू केले आहे. या पोर्टलद्वारे शेतकऱ्यांना घरबसल्या आपला माल विकण्याची संधी प्राप्त होणार आहे. ई-पोर्टलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आपल्या शेतमालाचा दर्जा, किंमत आदी माहिती अपलोड करता येते. त्यानंतर त्याचे वैज्ञानिक पद्धतीने परिक्षण केले जाते व नंतर ही माहिती देशातील सर्व शेतकरी व्यापाऱ्यांपर्यंत पोहोचती केली जाते.

National Board of Agricultural Marketing
Salcete News : पावसाळ्यातील परिस्थितीला तोंड देण्यास कोकण रेल्वे सज्ज

जर एखाद्या व्यापाऱ्याला गरज असेल व बाजारभाव परवडत असेल तर तो मागणी करू शकतो. विक्री करणाऱ्या शेतकऱ्याचा माल विकत घेणाऱ्याकडे पोहोचविण्याची सुद्धा व्यवस्था करण्यात आली आहे. या पोर्टलद्वारे देशातील बाजार समित्या जोडल्या गेल्या आहेत.

-सत्यवान देसाई, सचिव कृषी विपणन केंद्र.

National Board of Agricultural Marketing
Salcete : साळ नदीला जोडणारे सर्व नाले जिओ-बॅग तंत्राद्वारे स्वच्छ होणार - सुभाष शिरोडकर

गोव्यातही ‘ई-नाम पोर्टल’ची कार्यवाही सुरु झाली आहे. सर्व सातही मार्केट यार्डात पोर्टल संदर्भातील साधन सुविधा उपलब्ध करण्याचे काम सुरू झाले आहे. कर्मचाऱ्यांना व शेतकऱ्यांना शिक्षित करण्यासाठी वेगवेगळी शिबिरे आयोजित केली जात आहेत. या साठी सरकारने अनुदानही दिले आहे. सध्या गोव्यातील 572 शेतकऱ्यांची व्यापारी ई-नाम पोर्टलसाठी नोंदणी झाली आहे.

-प्रकाश वेळीप,

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com