Workers Protest in Pernem News, Aayush Hospital News Dainik Gomantak
गोवा

थकीत वेतनासाठी आयुष रुग्णालयाच्या कामगारांचा एल्गार

गेल्या सहा महिन्यांपासून थकलेलं वेतन तातडीने देण्याची कामगारांची मागणी

दैनिक गोमन्तक

पेडणे : थकीत वेतनाची मागणी करत पेडणे तालुक्यातील धारगळ येथे आयुष रुग्णालयाच्या कामावरील कामगारांनी आंदोलनाचं हत्यार उपसलं आहे. गेल्या सहा महिन्यांपासून वेतन थकल्याने कामगार आक्रमक झाले आहेत. मोपा विमानतळावरील कामगारांच्या आंदोलनानंतर आता आयुष रुग्णालयाच्या कामगारांनीही थकीत वेतन देण्याची मागणी केली आहे. (Workers Protest in Pernem News)

धारगळमध्ये सध्या आयुष रुग्णालयाचं (Hospital) काम सुरु आहे. सोमवारी याठिकाणी काम करणारे 25-30 कामगार अचानक आक्रमक होत त्यांनी बंडाचं हत्यार उपसलं. आपलं सहा महिन्यांपासून थकलेलं वेतन तातडीने देण्याची मागणी या कामगारांनी केली आहे. मात्र कामगारांच्या वेतनाचे पैसे आधीच कंत्राटदाराला दिले असून कामगारांना पैसे कंत्राटदारच देणार असल्याचं कंपनीच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे. कंत्राटदाराने मात्र कंपनीने महिन्याप्रमाणे पैसे दिले असून ते कामगारांचं वेतन देण्यासाठी पुरेसे नसल्याचं सांगत हात वर केले आहेत.

कंपनी आणि कंत्राटदाराच्या वादात आयुष रुग्णालयाच्या साईटवर काम करणाऱ्या कामगारांचे (Workers) हाल होत असल्याचा आरोप आता होऊ लागला आहे. कंपनी आणि कंत्राटदार दोघेही एकमेकांकडे बोट दाखवत पैसे देण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोपही कामगारांनी केला आहे. दरम्यान काही कामगार वेतन न मिळाल्याने आपल्या गावी परतले आहेत. यापैकी काही कामगारांना नातेवाईकांच्या मृत्यूनंतर (Death) घरी परतावं लागलं होतं, मात्र पैशांची गरज असूनही वेतन न मिळाल्याने त्यांना रिकाम्या हातीच परतावं लागलं आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: सरकारी नोकरी घोटाळ्यात भाजपचे नेते गुंतलेत; अमित पालेकरांचा हल्लाबोल!

Goa Post Office: गोव्यात पोस्टाची सेवा ठप्प! देशभरातील इंटरनेट सेवेत बिघाड; बॅंकिंग सेवेला मोठा फटका

Bhutani Project: ‘त्‍या’ तिघांना अटक करा! सांकवाळच्या तीस महिलांसोबत कुतिन्हो यांची मागणी

Goa News: गोव्यात भूरूपांतरासाठी अनेक प्रस्ताव! 1 लाख 18 हजार 756 चौरस मीटर जमीनीवर लक्ष; 'नगर नियोजन'ने मागवले आक्षेप

Sattari Crime: वाळपईतील व्यावसायिकाला 'स्टॉक एक्स्चेंज'च्या व्याजाचे आमिष दाखवून एक कोटींचा गंडा! बंगळूरू येथील संशयितास अटक

SCROLL FOR NEXT