Amit Patkar | Goa News Dainik Gomantak
गोवा

Goa PWD: सार्वजनिक बांधकाम खात्यातील कर्मचारीच असुरक्षित; खाते लोकांना काय सुरक्षा देणार? पाटकरांचा सवाल

Amit Patkar: स्लॅबचे तुकडे या कार्यालयातील कर्मचाऱ्यांवर पडल्यास त्यांच्या जीवाला धोका होऊ शकतो, असे त्यांनी सांगितले.

गोमन्तक डिजिटल टीम

केपे: सार्वजनिक बांधकाम खात्यात काम करणारे कर्मचारीच सुरक्षित नाहीत व हे खाते लोकांना काय सुरक्षा देणार, असा प्रश्‍न काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी उपस्थित केला आहे.

केपे येथील सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कार्यालयाला त्यांनी भेट दिली असता, सदर कार्यालयाच्या स्लॅबचे तुकडे खाली पडून छताच्या सळ्या दिसू लागल्याचे आढळले. या कार्यालयात काम करणारे कर्मचारी आपले मरण डोक्‍यावर घेऊन सध्‍या येथे काम करतात, अशी टीका पाटकर यांनी केली.

पाटकर यांनी सार्वजनिक बांधकाम खात्‍याचे प्रधान मुख्य अभियंते उत्तम पार्सेकर यांच्‍यावर टीका करताना, त्‍यांना फक्‍त स्‍वत:ला एक्‍सटेंशन पाहिजे. मात्र, आपल्‍याच हाताखालच्‍या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचे त्‍यांना काही पडून गेलेले नाही. जे खाते आपल्‍याच कर्मचाऱ्यांची सुरक्षा राखून ठेवू शकत नाही, त्‍या खात्‍याकडून रस्‍त्‍यांची दुरुस्‍ती करुन लोकांची सुरक्षा ठेवण्‍याची अपेक्षा कोण कशी ठेवू शकेल, असा सवाल त्‍यांनी केला.

अमित पाटकर व कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी आज अचानक केपे येथील बांधकाम खात्याच्या कार्यालयाला भेट दिली असता त्यांनी या कार्यालयाच्या छताचे तुकडे खाली पडत असल्याचे चित्र पाहिले. सदर स्लॅबचे तुकडे या कार्यालयातील कर्मचाऱ्यांवर पडल्यास त्यांच्या जीवाला धोका होऊ शकतो, असे त्यांनी सांगितले.

केपे येथील उप जिल्हाधिकारी कार्यालयाची इमारत बरीच जुनी झाली असून या इमारतीत मामलेदार, उप जिल्हाधिकारी, सब रजिस्ट्रार, महिला व बालविकास कल्याण अशी बरीच महत्वाची कार्यालये असून रोज शेकडो लोक याठिकाणी आपली कामे घेऊन येतात.

साबांखाचे कार्यालय सुरक्षित नाही तर लोकांना हे खाते सुरक्षित रस्ते व इमारती देऊ शकेल काय, असा प्रश्न पाटकर यांनी उपस्थित केला. यावेळी कुडचडेचे काँग्रेस नेते मनोहर नाईक व अन्‍य कार्यकर्ते उपस्‍थित होते.

कार्यालये स्थलांतरित करा!

राज्यातील जुन्या इमारतींविषयी काँग्रेस आमदारांनी विधानसभेत आवाज उठवला होता व यावेळी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी धोकादायक स्थितीत असलेली कार्यालये अन्यत्र स्थलांतरित करणार असे सांगितले होते.

पण अद्याप बांधकाम खात्यातर्फे कोणतीच पावले उचलली नसून या सरकारने धोकादायक स्थितीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा जीव धोक्यात घातला आहे, असे पाटकर म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ganesh Visarjan Tragedy: तेलंगणात गणेश विसर्जनाला गालबोट; पोलीस उपनिरीक्षकासह 13 भाविकांचा दुर्देवी मृत्यू, 26 जण गंभीर जखमी

Bank Employees Strike: शनिवारच्या सुट्टीसाठी बँक कर्मचाऱ्यांची आरपारची भूमिका; 40 मिनिटे अतिरिक्त कामाची तयारी, मात्र मागणी मान्य होईपर्यंत संप कायम

2027 च्या निवडणुकीत एकच ध्रुवीकरण हवे; '39-अ'चे समर्थक विरुद्ध '39-अ'चे विरोधक!

Lakshmi Narayanan Rajyog 2026: शुक्र-बुध युतीचा महाचमत्कार! लक्ष्मी नारायण योगाच्या प्रभावाने 'या' राशींवर होणार पैशाचा वर्षाव; संपत्तीत होणार बंपर वाढ

BSNL Tag Block Theft: 'बीएसएनएल'ला चोरांचा दणका, सासष्टीत टॅग ब्लॉकची चोरी; दूरध्वनी, इंटरनेट सेवा विस्कळीत

SCROLL FOR NEXT