Goa News |Worker beaten by police Dainik Gomantak
गोवा

Goa News: कुंडईत पोलिसांकडून कामगाराला बेदम मारहाण

चोरीचा संशय : कामगारांची सतावणूक होत असल्याचा पुती गावकर यांचा आरोप

दैनिक गोमन्तक

Goa News: कुंडई औद्योगिक वसाहतीतील एका कंपनीच्या कामगाराला चोरीच्या संशयावरून दोन पोलिसांनी बेदम मारहाण केली. याप्रकरणी गोमंतक मजदूर संघाचे अध्यक्ष तथा कामगारनेते पुती गावकर यांनी या पोलिसांना त्वरित निलंबित करून त्यांची सखोल चौकशी करण्याची मागणी फोंड्यातील पत्रकार परिषदेत केली. यावेळी पीडित कामगार नारायण राऊतराय उपस्थित होता.

पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, सोमवार, 23 रोजी कुंडई औद्योगिक वसाहतीतील या कारखान्यात ड्युटीवर नारायण राऊतराय हा गेला असता, कुंडई आऊटपोस्टवरील पोलिस कारखान्यात आले व नारायणला चोरीच्या आरोपावरून चौकशीसाठी नेले.

या कारखान्यात झालेल्या चोरीप्रकरणी एका रोजंदारीवरील कामगाराचा मोबाईल कारखान्याच्या अधिकाऱ्याकडे होता. मात्र, नारायणने या संशयित कामगाराच्या मोबाईलवर फोन केला असता, संबंधित अधिकाऱ्याने लगेच पोलिसांना बोलावले.

त्यानुसार आदित्य मांद्रेकर व विनय शिरवईकर या दोन्ही पोलिसांनी नारायणला ताब्यात घेऊन चौकशीच्या नावाखाली त्याला मारहाण केली.

पाच हजार रुपयांची मागणी

मारहाणीनंतर नारायणला सोडण्यासाठी पोलिसांनी पाच हजार रुपयांची मागणी केली. मात्र, आपल्याकडे तेवढे पैसे नसल्याचे नारायणने सांगितल्यावर शेवटी दीड हजारांवर हे पोलिस तयार झाले. त्यानुसार दीड हजार रुपये विनय शिरवईकरच्या मोबाईलवर ट्रान्स्फर करण्यात आले. नारायणला सोडल्यानंतर तो कारखान्यात आला व खाली कोसळला.

न्याय देण्यासाठी तत्पर

कामगारांना न्याय देण्यासाठी आपली कामगार संघटना गोमंतक मजदूर संघ कार्यरत आहे. नारायण राऊतराय हा आपल्या संघटनेशी निगडित असून कंपनी व्यवस्थापनाकडून आपल्या कामगार संघटनेच्या कामगारांची सतावणूक केली जात असल्याचा आरोपही पुती गावकर यांनी केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Gomantak TV Engineers Excellence Awards: जिथे प्रश्न, तिथे अभियंत्यांचा 'तोडगा'! गोमन्तक टीव्ही इंजिनिअर्स एक्सलन्स ॲवॉर्डने 11 अभियंत्यांचा गौरव; खांडेपारकरांना जीवनगौरव

Horoscope 21 Saptember 2026: सोमवारचा चमत्कारिक योग! महादेवाची कृपा अन् ग्रहांची साथ; 'या' राशींवर होणार धनवर्षाव

Sudan Gold Mine Accident: 7 दिवसांत दुसऱ्यांदा काळजाचा ठोका चुकवणारा अपघात! सुदानमध्ये सोन्याची खाण खचून 11 मजुरांचा मृत्यू, 30 हून अधिक जखमी

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

SCROLL FOR NEXT