Railway Project Dainik Gomantak
गोवा

'रावणफोंडातील सहापदरी रेल्वे उड्डाणपुलाचे काम लवकरच लागेल मार्गी'

दिगंबर कामत: मडगावातील इतर विकासकामांचा घेतला आढावा

दैनिक गोमन्तक

मडगाव: रावणफोंड येथील पूर्व बगल मार्गावर येणाऱ्या सहा पदरी उड्डाण पुलासाठी निविदा तयार करण्यात आली आहे. आता हा खर्चाचा तपशील गोवा साधनसुविधा महामंडळाच्या समितीसमोर मांडून लवरकच कामाची निविदा जारी करण्यात येणार आहे,अशी माहिती मडगावचे आमदार दिगंबर कामत यांनी दिली.

आज त्यांनी साधनसुविधा महामंडळाच्या अभियंत्यांसमवेत बैठक घेऊन या कामाचा आढावा घेतला. वास्तविक हे काम यापूर्वीच सुरू होणार होते, मात्र विधानसभा निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यामुळे या कामाची प्रकिया बंद पडली होती, असे त्यांनी सांगितले.

सध्या रावणफोंड येथे जो उड्डाणपूल आहे. त्यालाच समांतर, असा हा सहा पदरी उड्डाणपूल बांधण्यात येणार असून हा पूल बांधल्यावर कारवारच्या दिशेने जाणारी वाहतूक विना व्यत्यय करता येणार आहे. या मार्गावरील नियमित वाहतूकदारांची अनेक वर्षांपासूनची तशी मागणी आहे.

रिंग रोड परिसराचे सौंदर्यीकरण आणि लोकांना सकाळी व्यायाम करण्यासाठी ‘वॉकिंग ट्रॅक’ या कामाचाही आज कामत यांनी आढावा घेतला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Asian Games 2026: Chak De India! वादळी खेळाच्या जोरावर भारतानं दक्षिण कोरियाला 8-2 ने लोळवलं; सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं

SCROLL FOR NEXT