Sonsodo waste Problem Dainik Gomantak
गोवा

सोनसोडोत साठवलेला कचरा बाहेर काढण्याचे काम सुरू

दैनिक गोमन्तक

मडगाव: अखेर गोवा घनकचरा व्यवस्थापन महामंडळाने सोनसोडो कचरा प्रक्रिया प्रकल्पात दाखल होऊन तेथील जुन्या प्रकल्पात तुंबलेला कचरा बाहेर काढून त्याचे बायोरेमेडिएशन सुरू केले आहे. प्रकल्पात सुमारे चौदा हजार टन कचरा साठलेला असून गेल्या आठवड्यात मंत्री बाबूश मोन्सेरात यांनी संबंधित आमदारांसमवेत सोनसोडोला भेट देऊन केलेल्या पाहणीनंतर महामंडळाला सूचना केली होती व त्यानुसार हे काम सुरू झाले आहे.

यापूर्वी 2020 मध्ये प्रकल्पात असाच कचरा तुंबला होता व तो बाहेर काढण्यासाठी पालिकेने 80 लाखांवर रक्कम खर्च केली होती.

सध्या हा कचरा रेमिडिएशनसाठी सध्या तेथे चार मल्टिडेक स्क्रीन कार्यरत आहेत. शिवाय अन्य अवजड यंत्रेही आहेत. दुसरीकडे तेथील राशी स्वरूपातील कचऱ्याचे रेमिडीएशन प्रगतिपथावर आहे, असे सुत्रांनी सांगितले.

दरम्यान, मडगावातील रोज गोळा होणाऱ्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठीही महामंडळाने इच्छुकांकडून इच्छा प्रस्ताव मागविले आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

St. Francis Xavier DNA चाचणी मागणीने गोव्यात धार्मिक तेढ; हिंदुवादी संघटना, ख्रिस्ती समाजाचे राज्यभर मोर्चे, वातावरण तंग

Saint Estevam Accident: बाशुदेव भंडारी बेपत्ता प्रकरणी मित्र कल्पराज आणि प्रेयसीची दोन तास चौकशी; पोलिसांकडून प्रश्नांची सरबत्ती!

Goa Today's News Live: DNA चाचणी मागणीचा वाद; कोलवा सर्कल ब्लॉक, वाहतूक वळवली!

Sunburn Festival 2024: सनबर्नविरोधात कामुर्लीत स्थानिकांचा कडक विरोध; उद्याची बैठक ठरणार निर्णायक!

Mhadei Water Dispute: ...कर्नाटकाविरोधात लढण्यास सावंत सरकार ठरले कुचकामी; आलेमाव यांचा घणाघात

SCROLL FOR NEXT