हळर्णचा पंपहाऊस हरवला झुडपात!

जीवनदायिनी संस्थेचा आरोप: कोट्यवधींचा खर्च वाया; नको तिथे पैशांचा अपव्यय
Pumphouse and Transformers
Pumphouse and TransformersDainik Gomantak
Published on
Updated on

मोरजी: हळर्ण - शापोरा नदीकिनारी कोट्यवधी रुपये खर्चून जलसिंचन खात्याने उभारलेला पंप हाउस व वीज ट्रान्स्फॉर्मर सध्या अर्धवट स्थित गंजून व झुडपात हरवून गेला आहे.

पाणीपुरवठ्यासाठी हळर्ण येथील पंप हाऊस कार्यान्वित करण्याऐवजी मोपा विमानतळासाठी सध्या तिळारी प्रकल्पातून येणाऱ्या कालव्याला नागझर येथे पंप हाऊस बसून दिवसाला पाच एमएलडी पाणी देण्याची योजना सरकारने आखली आहे. शिवाय बैलपार नदीकिनारीही पंप हाऊस बसवून त्याद्वारे तेही पाणी मोपा विमानतळावर देण्याची योजना आखली जात आहे. त्यामुळे हळर्ण येथील पंप हाऊस तसाच ठेवून सरकार नको तिथे पैसा खर्च करत आहे, असा आरोप जीवनदायिनी संस्थेचे अध्यक्ष नाना ऊर्फ नारायण केरकर यांनी केला आहे.

Pumphouse and Transformers
पैंगीण बेताळ देवस्थानात जागोर उत्सव

हळर्ण - तळर्ण पंचायत क्षेत्रातील शापोरा नदीकिनारी जलसिंचन विभागाने पंप हाऊस उभारण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले. शिवाय या पंप हाऊसला वीज जोडण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा ट्रान्‍स्फॉर्मरही उभारला आहे. या वीज ट्रान्स्फॉर्मरवर अद्याप वीजवाहिन्या गेलेल्या नाहीत. तसेच पंप हाऊस बसवण्यासाठी जी यंत्रणा उभारली आहे, ती पूर्णपणे निकामी झाली आहे. त्यामुळे हा पंप हाउस एखाद्या भूत बंगल्याप्रमाणे झाडाझुडपात लपून बसलेला आहे. अशी स्थिती असताना जलसिंचन खात्याच्या अधिकाऱ्‍यांनी याकडे दुर्लक्ष का केले व हळर्ण येथील पंप हाउसचे काम अर्धवट स्थितीत का, असा सवाल केरकर यांनी केला आहे.

एका बाजूने घरगुती वापरासाठी पाणी मिळत नाही, तसेच व्यवसाय उद्योगांनाही पाण्याचा प्रश्न सतावत असतानाच सरकार सध्या बैलपार नदीवर 27 कोटी रुपये खर्चून पंप हाउस बसवत आहे, तर दुसऱ्या बाजूने कोट्यवधी रुपये खर्चून हळर्ण तळर्ण परिसरातील उभारलेला पंप हाउस कार्यान्वित करण्यात सरकार अपयशी ठरले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com