Goa  Dainik Gomantak
गोवा

Goa News : महिलांनी स्वतःची काळजी घ्यावी : डॉ. दुभाषी

Goa News : बिना शेट्ये म्हणाल्या, की महिलांसाठी येणारा प्रत्येक दिवस हा महिलादिनच असतो, तरीही पुरुषांच्या सहकार्याशिवाय तो पूर्ण होऊ शकत नाही.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa News :

कुठ्ठाळी, महिलांनी आपल्या कुटुंबियांकडे लक्ष देण्याबरोबरच स्वतःच्या तब्येतीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, अनेक जबाबदाऱ्या पार पाडताना स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे डॉ. पुष्पा दुभाषी यांनी सांगितले.

दीपविहार उच्च माध्यमिक विद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे काल दुपारी आयोजित महिलादिन कार्यक्रमात त्या प्रमुख पाहुण्या या नात्याने बोलत होत्या.

यावेळी व्यासपीठावर डॉ. पुष्पा दुभाषी, सन्मानित पाहुण्या म्हणून दीपविहार हायस्कूलच्या मुख्याध्यापिका बिना शेट्ये, दीपविहार उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्राचार्य मृणाल कोरगावकर, ज्येष्ठ शिक्षिका प्रा. मारिया डायस, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे समन्वयक सुनील शेट उपस्थित होते.

बिना शेट्ये म्हणाल्या, की महिलांसाठी येणारा प्रत्येक दिवस हा महिलादिनच असतो, तरीही पुरुषांच्या सहकार्याशिवाय तो पूर्ण होऊ शकत नाही.

प्राचार्य सौ. मृणाल कोरगावकर यांनीही यावेळी विचार मांडले. प्रा. नंदकुमार सातार्डेकर, किरण सैल, राजेश पवार व विठ्ठल खर्डे यांनी सर्व मान्यवर पाहुणे तथा सर्व शिक्षिका व इतर महिला कर्मचाऱ्यांचा पुष्पगुच्छ प्रदान करून सन्मान केला. प्रा. सुनील शेट यांनी स्वागत व प्रास्ताविकामध्ये महिलादिन आयोजनाचा हेतू स्पष्ट करून आभार मानले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT