Comunidade Land Dainik Gomantak
गोवा

Comunidade: कोमुनिदादींत महिलांना समानता असावी

Comunidade: सडेतोड नायक : कोमुनिदादीच्या मूळ संकल्पनेलाच तडा गेल्याचे मान्यवरांचे ठाम मत

दैनिक गोमन्तक

Comunidade: कोमुनिदादी मुख्यत्वे तीन प्रकारच्या आहेत. पहिली गावकारी, दुसरी शेअर होल्डर, तिसरी गावकारी व शेअरहोल्डर. कोमुनिदादींमध्ये महिला भागधारक आहेत; परंतु गावकारी पद्धतीत केवळ पुरुषांना अधिकार आहेत.

महिलांना नाहीत. जर एखाद्या गावकऱ्याला केवळ मुलगीच असेल तर त्याचे काय? त्यामुळे कोमुनिदादींमध्ये महिलांनाही समान अधिकार मिळणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन विजिलिया डिसा यांनी केले. त्या ‘गोमन्तक’चे संपादक-संचालक राजू नायक यांच्या ‘सडेतोड नायक’ या विशेष चर्चासत्रात बोलत होत्या. यावेळी ‘बायलांचो साद’ संघटनेच्या सबिना मार्टिन्स तसेच पत्रकार आगुस्तो रॉड्रिग्स यांचाही सहभाग होता.

सबिना मार्टिन्स म्हणाल्या की, कोमुनिदादींमधील महिलांना मिळत नसलेल्या समान अधिकाराबाबत आम्ही काही तज्ज्ञांशी चर्चा केल्यावर समजले की, प्रत्येक कोमुनिदादीचे कायदे, नियम वेगवेगळे आहेत. काही गावकारी कोमुनिदादींमध्ये वारसा अधिकार मुलाला द्यावा, मुलीला नव्हे, असे नमूद केले आहे.

विचारमंथन गरजेचे

कोमुनिदादीमध्ये असमानता नसावी यासाठी रविवार, १४ जानेवारी रोजी एनआयओ सभागृहात कोमुनिदाद अधिवेशनात हा विषय मांडण्यात आला, त्यावेळी काही प्रतिनिधींनी याला विरोध केला. केवळ मुलाला कोमुनिदादचे अधिकार मिळतील, हे विधान काढण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. याबाबत विचारमंथन होणे गरजेचे असल्याचे सबिना मार्टिन्स यांनी सांगितले.

प्रत्येकाचे वेगळे कायदे

प्रत्येक कोमुनिदादीमध्ये महिलांप्रती असमानता आहे, असे म्हणता येणार नाही. प्रत्येकाचे कायदे वेगळे आहेत. प्रत्येक कोमुनिदादीला आपले निर्णय घेण्याचे अधिकार आहेत, त्यामुळे त्यांनी निर्णय घेऊन महिलांना अधिकार देणे गरजेचे आहे. आज कोमुनिदादीची मूळ संकल्पनाच अनेकजण विसरले आहेत. कोमुनिदादीची भूमिका ही समाजाची काळजी घेणे आहे; परंतु आता त्याचा व्यवसाय होत असल्याची खंत आगुस्तो रॉड्रिग्स यांनी व्यक्त केली.

काळानुरूप बदल व्हावेत

काळानुरूप बदल करत महिलांनाही समान अधिकार देणे गरजेचे आहे. गोव्यातील लोकसंख्येचा विचार करता सद्यस्थितीत हजार मुलांमागे केवळ ७०० मुली आहेत. काहींना केवळ एकच मुलगी किंवा मुलगा आहे. दिवसेंदिवस संख्येत घट होत आहे, त्यामुळे अधिवेशनात महिलांच्या हक्कांसंबंधी झालेल्या चर्चेवर विचार व्हावा आणि महिलांना देखील अधिकार मिळावेत, असे विजिलिया डिसा यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viresh Borkar: '..पुन्हा एकदा रस्त्यावर उतरणार'! बोरकरांचा निर्धार कायम; ‘कलम 39 A रद्दसाठीचा लढा करणार तीव्र

महत्वाची बातमी! युद्धामुळे आखाती देशात अडकलेल्या गोमंतकीयांना मिळणार मदत; भारतीयांच्या सुरक्षिततेसाठी मार्गदर्शक सूचना जारी

Ayatollah Khamenei: इराणमधून मोठी बातमी! सर्वोच्च नेते 'अयातुल्ला खामेनेई' यांचा मृत्यू; अधिकृत यंत्रणांनी केली निधनाची पुष्टी

Goa Politics: खरी कुजबुज; गोव्याचा वारसा, चांदराचे सौदागर कोण?

Goa Nightclub Fire: ‘बर्च’प्रकरणी मोठी अपडेट! निलंबित केलेल्या पंचायत संचालक, प्रदूषण मंडळाच्या सदस्य सचिव यांचे निलंबन मागे

SCROLL FOR NEXT