Iranian Drone Attack : होर्मुज स्ट्रेटमध्ये आगीचे लोळ! अमेरिकेनं 'तौस्का' जहाज रोखताचं इराणचा ड्रोन हल्ला; तणाव पुन्हा शिगेला

Iranian Drone Attack on US Warships : अरब सागरात इराण आणि अमेरिका यांच्यातील तणाव आता युद्धाच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचला.
Iran Launches Drone Attack At US Military Ships
Iranian Drone AttackDainik Gomantak
Published on
Updated on

Iranian Drone Attack on US Warships: अरब सागरात इराण आणि अमेरिका यांच्यातील तणाव आता युद्धाच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचला. इस्लामाबादमध्ये 40 दिवस चाललेली शांतता बैठक निष्फळ ठरल्यानंतर अमेरिकेने होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये नाकेबंदी जाहीर केली होती. मात्र, आता अमेरिकेने इराणच्या 'तौस्का' या मालवाहू जहाजाला आपल्या ताब्यात घेतल्याने या संघर्षाने हिंसक वळण घेतले. इराणने या कारवाईचा तीव्र निषेध करत प्रत्युत्तरादाखल अमेरिकेच्या लष्करी जहाजांवर ड्रोनद्वारा हल्ला चढवला, ज्यामुळे दोन्ही देशांमधील युद्धविराम आता पूर्णपणे कोलमडल्याचे चित्र दिसत आहे.

अमेरिकन सेंट्रल कमांडने दिलेल्या माहितीनुसार, 19 एप्रिल रोजी अरब सागरात तैनात असलेल्या अमेरिकन नौदलाने इराणचे ध्वज असलेल्या 'तौस्का' या जहाजाला रोखले. हे जहाज अमेरिकेने लागू केलेल्या नाकेबंदीचे उल्लंघन करुन इराणच्या 'बंदर अब्बास' बंदराकडे जाण्याचा प्रयत्न करत होते. अमेरिकेच्या 'यूएसएस स्प्राउन्स' या क्षेपणास्त्रवाहू युद्धनौकेने या जहाजावर कारवाई केली. अमेरिकेने (America) दावा केला की, ही नाकेबंदी इराणवर दबाव निर्माण करण्यासाठी कायदेशीररीत्या लागू करण्यात आली. मात्र, इराणने या कारवाईला 'समुद्री चाचेगिरी' असे संबोधले.

Iran Launches Drone Attack At US Military Ships
Iran America War: पुन्हा इतिहास मोठं वळण घेईल?

इराणच्या (Iran) सरकारी प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकन सैनिकांनी ओमानच्या समुद्रामध्ये इराणच्या व्यापारी जहाजावर गोळीबार केला आणि त्यानंतर हेलिकॉप्टरच्या साहाय्याने त्यांचे सैनिक जहाजाच्या डेकवर उतरवले. या सैनिकांनी जहाजाची नेव्हिगेशन यंत्रणा निकामी करुन ते ताब्यात घेतले. इराणच्या 'हजरत खातम अल-अनबिया' लष्करी मुख्यालयाने या घटनेला अमेरिकेचे उघड उल्लंघन म्हटले असून, "हा सशस्त्र दरोडा आहे," अशी टीका केली. या घटनेचा बदला म्हणून इराणच्या लष्कराने तात्काळ काही अमेरिकन लष्करी जहाजांवर ड्रोन हल्ले केले असून यामुळे अरबी समुद्रात मोठा स्फोट झाल्याची माहिती 'रॉयटर्स'ने दिली.

Iran Launches Drone Attack At US Military Ships
US Iran War: "आमच्या अटी मान्य करा तरच मार्ग खुला" इराणचा टायगर अवतार! व्हिडिओ शेअर करत अमेरिकेला दिलं खुलं आव्हान VIDEO

तेहरानने या घटनेनंतर अमेरिकेला गंभीर परिणामांचा इशारा दिला. इराणच्या सशस्त्र दलांनी स्पष्ट केले की, अमेरिकेने केलेल्या या कृतीला लवकरच चोख प्रत्युत्तर दिले जाईल. "आक्रमक अमेरिकेने युद्धविराम तोडून इराणच्या संप्रभुततेवर घाला घातला, याचा हिशोब चुकता केला जाईल," असे इराणच्या निवेदनात म्हटले. दरम्यान, या जागतिक तणावामुळे तेल वाहतुकीवर मोठे परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली असून आंतरराष्ट्रीय स्तरावर चिंतेचे वातावरण आहे. दोन्ही देशांमधील हा संघर्ष आता केवळ कूटनीतिक राहिला नसून प्रत्यक्ष लष्करी कारवाईकडे वळल्याने तिसऱ्या महायुद्धाची भीती वर्तवली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com