Goan Youth Arrested By Chhattisgarh Police Dainik Gomantak
गोवा

हॉटेलमध्ये झाली मैत्री, लग्नाचे आमिष देऊन केला लैंगिक अत्याचार; गोव्याच्या तरुणाला छत्तीसगड येथे अटक

Pramod Yadav

छत्तीसगड: लग्नाचे आमिष देऊन लैंगिक अत्याचार केल्याची घटना छत्तीसगड राज्यातील गंज येथून समोर आली आहे. गोव्याचा रहिवासी असणाऱ्या संशयित आरोपीला गंज पोलिसांनी अटक केली आहे. संशयिताने पीडित मुलीशी पहिल्यांदा मैत्री केली आणि त्यानतंर लग्नाचे आमिष देऊन रायपूरमधील एका हॉटेलमध्ये लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार पोलिसांनी प्राप्त झालीय.

प्रिन्स डिसिल्वा (रा. उत्तर गोवा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पीडितेने आपल्या तक्रारीत पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, रायपूरमधील एका हॉटेलमध्ये काम करत असताना तिची आरोपी प्रिन्स डी सिल्वासोबत भेट झाली. प्रिन्स हा गोव्याचा रहिवासी आहे. दोघांमध्ये मैत्री झाल्यानंतर दोघे एकमेकांशी फोनवर बोलू लागले.

दरम्यान, कामाच्या बहाण्याने संशयित आरोपी तरुणीला रेल्वे स्थानकाजवळील हॉटेलमध्ये घेऊन गेला. संशयिताने पीडितेवर प्रेम असल्याचे सांगत तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला, असे तक्रारीत म्हटले आहे.

लग्नाबाबत विचारणा केली असता संशयित तरुणाने तिला आग्रा येथे जाऊन लग्न करु असे आश्वासन दिले. दोघेही आग्रा येथे पोहोचले. तरुणीने आग्रा येथे लग्नाचा आग्रह केल्यानंतर तरुणाने टाळाटाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर दोघांमध्ये वाद झाला.

तरुणाने मुलीला मारहाण करत लग्नास नकार दिला. यानंतर मुलगी आपल्या घरी परतली. तरुणाने मुलीचा पाठलाग करून तिच्या घरी जाऊन तिला जीवे मारण्याची धमकी देत ​​लग्नास नकार दिला.

त्यानंतर तरुणीने गंज पोलिस स्टेशन गाठून आरोपीविरुद्ध तक्रार दाखल केली. याचदरम्यान संशयित तरुण पुन्हा एकदा पीडितेला भेटण्यासाठी रायपूरला पोहोचला. यावेळी पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली.

संशयित सिल्वाला न्यायालयासमोर हजर केले असता त्याला न्यायालयीन कोठडी सुनाविण्यात आली असून, तो सध्या मध्यवर्ती कारागृहात आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's News Live: हणजुणेत थार गाडीची दुचाकीला धडक; तिघेजण गंभीर जखमी

ISL 2024-25: आगामी लढतीसाठी FC Goa संघात होणार बदल? मार्केझ यांनी दिले संकेत

Konkan Railway: धावत्या रेल्वेतून कोसळली विद्यार्थिनी, RPF जवानाच्या प्रसंगावधानामुळे थोडक्यात वचावली Video

Mopa Airport: ...तर सरपंचांनी राजीनामे द्यावेत! ‘मोपा’तील नोकऱ्यांवरुन जनसंघटना आक्रमक

Mandrem: सरपंचपदाची माळ कोणाच्या गळ्यात? मांद्रेत ग्रामस्थांच्या चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT