CM Pramod Sawant on Women Entrepreneurs Dainik Gomantak
गोवा

Women Entrepreneurship: "महिलांजवळ उत्तम व्यवसाय चालवण्याचे गुण" ग्रँड अस्तुरी 2024 मध्ये मुख्यमंत्र्यांनी केले महिला उद्योजकांचे तोंडभरून कौतुक

CM Pramod Sawant on Women Entrepreneurs: मार्केटिंग आणि आर्थिक पाठबळाच्या जोरावर गोव्यातील महिलांना व्यवसाय उभे करण्यासाठी मदत केली जाईल

Akshata Chhatre

पणजी: गोव्यातील जवळपास एक लाख महिलांनी ग्रामीण विकास संस्थेकडून १ लाख ते ४ लाख रुपयांपर्यंतच्या व्याजमुक्त कर्जासाठी अर्ज केला होता आणि या रकमेतून त्यांनी स्वतःचे व्यवसाय उभे केल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. मार्केटिंग आणि आर्थिक पाठबळाच्या जोरावर गोव्यातील महिलांना व्यवसाय उभे करण्यासाठी मदत केली जाईल असे देखील मुख्यमंत्री ग्रँड अस्तुरी 2024 या कार्यक्रमात म्हणालेत.

कुठलीही नवीन गोष्ट हाती घेण्यात महिला पुरुषांपेक्षा अधिक सक्षम आहेत. बँक किंवा स्वयंचलित गटांकडून घेतलेली रक्कम परत करण्यात देखील महिला नेहमीच यशस्वी झाल्या आहेत आणि महिलांवर अगदी सहज विश्वास देखील ठेवला जातो, जी त्यांची जमेची बाजू आहे असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी उद्योग क्षेत्रात उतरलेल्या महिलांचं कौतुक केलं.

महिलांजवळ उत्तम व्यवसाय चालवण्याचे गुण आहेत मात्र आर्थिक मदत मिळत नसल्याने किंवा मार्केटिंगमुळे त्या अनेकवेळा मागे राहतात. महिलांना जर का या सुविधा मिळाल्या तर नक्कीच त्या उत्तम व्यवसाय चालवून दाखवू शकतील असा विश्वास मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केला.

गोवा चेंबर्स ऑफ कॉमर्स आणि इंडस्ट्रीजचे अध्यक्ष श्रीनिवास धेम्पो देखील या कार्यक्रमात उपस्थित होते. जमलेल्या सर्वांसमोर मत व्यक्त करताना त्यांनी देखील महिलांच्या कामाचा गौरव केला. धेम्पो म्हणाले की जागतिक स्थरावर महिला उत्तम कामगिरी बजावत आहेत आणि गोवा देखील याला अपवाद ठरत नाही, मात्र महिलांनी आणखीन मोठी झेप घ्यावी म्हणून त्यांच्यासाठी काही प्रशिक्षण शिबिरांची आखणी तसेच आर्थिक मदत केली गेली पाहिजे. समाजातील संकुचित वृत्तीमुळे आपण महिलांचे नेतृत्व स्वीकारण्यात मागे पडतो असेही ते म्हणाले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kabir Bedi In Goa: 80व्या वर्षी कबीर बेदींचा गोव्यात रोमान्स, 29 वर्षांनी लहान असणाऱ्या बायकोसोबत 'ट्रिपल' सेलिब्रेशन; फोटो व्हायरल!

Goa Rain 2025: गोव्यात परतीच्या पावसाचा शेतीला मोठा तडाखा! 4 हजारहून अधिक शेतकऱ्यांचं नुकसान; डिचोलीला सर्वाधिक आर्थिक फटका

Donald Trump: 'नोबेल मिळाला नाही, आता मी शांततेचा विचार करणार नाही'; ट्रम्प यांचं नॉर्वेला खळबळजनक पत्र, ग्रीनलँडवर ठोकला दावा!

Bicholim Mining Protest: पैरातील लोकांचा खाणीविरोधात पुन्हा एल्गार! साळगावकर खाणीचे कामकाज पाडले बंद; प्रलंबित मागण्यांसाठी ग्रामस्थ आक्रमक

Pakistani Actress Video: "भारतीय पुरुष पाकिस्तानी मुलींसाठी वेडे...", पाक अभिनेत्रीच्या दाव्याने सोशल मीडियावर वाद, व्हिडिओ VIRAL

SCROLL FOR NEXT