Accident Dainik Gomantak
गोवा

Sancoale Accident: दुर्दैवी! भरधाव कारच्या धडकेत सांकवाळ येथे महिला ठार; तिघे गंभीर

Goa Accident: पादचाऱ्यांना कारने ठोकर दिल्याने झालेल्या अपघातात एक महिला ठार झाली तर अन्य तिघेजण जखमी झाले. हा अपघात सायंकाळी ७ वा.च्या सुमारास उपासनगर-सांकवाळ महामार्गावर घडला.

गोमन्तक डिजिटल टीम

Sancoale Highway Accident

वास्को: पादचाऱ्यांना कारने ठोकर दिल्याने झालेल्या अपघातात एक महिला ठार झाली तर अन्य तिघेजण जखमी झाले. हा अपघात रविवारी सायंकाळी ७ वा.च्या सुमारास उपासनगर-सांकवाळ महामार्गावर घडला. जखमींना मडगावच्या जिल्हा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. मृत महिलेचे नाव गुलताजबी पटेल असे आहे.

अधिक माहितीनुसार. जीए ०७ टी ०१५६ या रेन्ट अ कारने तिघा पादचाऱ्यांना धडक दिली. ही कार वास्कोहून वेर्णाच्या दिशेने जात होती. भरधाव निघालेल्या कारने धडक दिल्याने गुलताजबी पटेल, तहसीलदार साहिल, महम्मद यासीन ताम्बाडी हे तिघेही पादचारी दूरवर फेकले गेले. हे सर्व पादचारी कासावली भागात राहणारे आहेत.

पटेल या महिलेची प्रकृती गंभीर असल्याचे दिसताच तिला गोमेकॉमध्ये दाखल केले. मात्र, तेथे तिचा मृत्यू झाला. तर अन्य दोघे गंभीर जखमी असून त्यांना मडगावच्या जिल्हा हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. वेर्णा पोलिसांनी या अपघाताचा पंचनामा केला. याप्रकरणी पोलिसांनी आफताब फराशी या कारचालकाविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT