Goa Accident 
गोवा

Goa Accident Death: थिवी येथे ट्रकच्या धडकेत युवती ठार तर पणजीत कारचा अपघात

Goa Accident Death: अपघातानंतर संशयित ट्रकचालकाने घटनास्थळावरून पळ काढला.

गोमंतक ऑनलाईन टीम

Goa Accident Death

कान्सा-थिवी येथे ट्रकने ओला इलेक्ट्रीक या स्कूटरला धडक दिल्याने झालेल्या अपघातात सुजाता साळगावकर (वय २६, रा. नास्नोळा-बार्देश) ही युवती ठार झाली. तर अपघातानंतर संशयित ट्रकचालकाने घटनास्थळावरून पळ काढला.

उपलब्ध माहितीनुसार, हा अपघात शनिवारी दुपारी दीडच्या सुमारास घडला. जीए-०८-टी-५४९४ क्रमांकाचा ट्रक माडेल ते अस्नोडाच्या दिशेने जात होता, तर विरुद्ध दिशेने सुजाता साळगावकर ही जीए-०३ -एएक्स- २२५४ क्रमांकाच्या ओला इलेक्ट्रीक स्कूटरवरून येत होती.

कान्सा-थिवी येथे भारतीय स्टेट बँकेजवळ संशयित ट्रकचालकाने चुकीच्या दिशेने जात समोरून येणाऱ्या दुचाकीला धडक दिली. ट्रकची धडक बसताच युवती दुचाकीवरून उसळून रस्त्यावर पडली आणि गंभीर जखमी झाली. तिची दुचाकी ट्रकच्या खाली सापडली.

जखमीला म्हापसा जिल्हा इस्पितळात उपचारार्थ दाखल केले. पण त्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता. अपघातानंतर ट्रकचालकाने वाहन घटनास्थळीच सोडून पळ काढला.

पणजीत कारचा अपघात

पणजी शहरात शुक्रवारी रात्री उशीरा गोवा मनोरंजन सोसायटी (Entertainment Society of Goa) समोर कारचालकाचा ताबा सुटून कार विजेच्या खांबाला धडकली. या अपघातात कारचालक किरकोळ जखमी. सुदैवाने जिवितहानी झाली नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assembly Session 2026: खेळाडूंची 98 लाखांची बक्षिसे महिनाभरात मिळणार; क्रीडामंत्री तवडकरांची विधानसभेत हमी, यापुढे वितरणाला विलंब होणार नाही

Goa ST Reservation: धनगर समाजाच्या 'एसटी' दर्जाच्या प्रस्तावावर पुन्हा प्रक्रिया सुरू; मुख्यमंत्र्यांची माहिती, सरदेसाईंच्या प्रश्नाला उत्तर

Goa E20 Petrol: ई-20 वरुन विधानसभेत खडाजंगी! पॉवर पेट्रोल वापरण्याच्या काब्रालांच्या सल्ल्यावर सरदेसाई भडकले; म्हणाले-'हे तर जखमेवर मीठ चोळण्यासारखं'

UN Report: मुंबई-कोलकाता बुडणार? 14000000 लोकांच्या जिवाला थेट धोका; नेपाळ दुर्घटनेनंतर 'युनो'चा भारताला धडकी भरवणारा इशारा

'कार्यक्रमांच्या नावावर कोट्यवधींची उधळपट्टी'! सरदेसाईंचा सरकारवर हल्लाबोल; स्वयंसाहाय्य गटांच्या नावाखाली 21.50 कोटींच्या खर्चाची चौकशी करा

SCROLL FOR NEXT