Siolim Crime News: पाळीव कुत्र्यावरुन वाद; गुडे-शिवोलीत एकावर चाकू हल्ला

Siolim Crime News: पोलिसांनी तात्काळ कारवाई करताना संशयित सिमेपुरुषकर याला अटक केली. सध्या त्याची रवानगी पोलिस कोठडीत करण्यात आली आहे.
pet dog
pet dogDainik Gomantak

Siolim Anjuna

गुडे-शिवोली परिसरात पाळीव कुत्र्याला घेऊन फेरफटका मारणारे दशरथ दिवकर यांच्यावर चिंतामणी सिमेपुरूषकर याने किरकोळ वादातून चाकुहल्ला केल्याची तक्रार हणजूण पोलिसांत दाखल करण्यात आली आहे.

त्यानुसार पोलिसांनी तात्काळ कारवाई करताना संशयित सिमेपुरुषकर याला अटक केली. सध्या त्याची रवानगी पोलिस कोठडीत करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दशरथ दिवकर हे आपल्या पाळीव कुत्र्यासह आज शनिवारी सकाळी आपल्या घराच्या परिसरात फेरफटका मारत होते. संशयित चिंतामणी सिमेपुरुषकर याने कुत्रा जागोजागी घाण करत असल्याबद्दल दिवकर यांना जाब विचारला.

यावेळी त्यांच्यात किरकोळ बाचाबाची झाली. त्यानंतर चिंतामणी सिमेपुरुषकर याने रागाच्या भरात दिवकर यांच्या अंगावर धावून जात त्यांच्यावर चाकूने वार केले.

या हल्ल्यात दीवकर जखमी झाले असून त्यांच्यावर म्हापशातील जिल्हा इस्पितळात उपचार सुरू आहेत. हणजूण पोलिस पुढील तपास करीत आहेत.

pet dog
Goa Crime News: गोव्यात चाललंय काय? आणखी एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, आईवरही अतिप्रसंगाचा प्रयत्न

मोपा विमानतळावरील टॅक्सी चालकाला पोलिसाकडून मारहाण?

मोपा विमानतळावरील टॅक्सी चालक दिनेश खडपे याला मोपा विमानतळ पोलिस स्थानकातील पोलिस आशिष परब यांनी मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी एक सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आले असून, मोपा टॅक्सी चालकांनी मोपा पोलिस स्थानकात एकत्र येत योग्य कारवाईची मागणी केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com