Prajwalita Gadgil Dainik Gomantak
गोवा

Women Day Special : जीवनाशी संघर्ष करून बनली कीर्तनकार; प्रज्वलिता गाडगीळचा थक्क करणारा प्रवास

Women Day Special : : परिस्‍थितीला झुकवले; पतीच्‍या निधनानंतर सगळा संसार वाऱ्यावर पडला होता. अशा बिकट स्थितीत साखळीत राहून शिवणवर्गाला जाऊ लागली. त्यानंतर रवींद्र भवनात गायन, सतारवादन, हार्मोनियमवाद अशा उपक्रमांत सहभाग घेतला.

गोमन्तक डिजिटल टीम

पद्माकर केळकर

Women Day Special :

जीवनात २०१० साली फार वाईट घटना घडली. पतीचे अचानक निधन झाल्याने संसाराच्या सुखात दु:ख पसरले. पण कठीण समयी बंधूंनी साथ दिली व पुन्हा जीवनात नवी पहाट आली. भावाने घरी आश्रय दिला.

हळूहळू स्वत:ला सावरत कपडे शिवणे, लेखन, गायन, वादन आणि कीर्तनकार बनले. स्वत:ला सिद्ध करून दाखवले, असे धावे-सत्तरी येथील प्रज्वलिता प्रकाश गाडगीळ यांनी सांगितले.

पतीच्‍या निधनानंतर सगळा संसार वाऱ्यावर पडला होता. अशा बिकट स्थितीत साखळीत राहून शिवणवर्गाला जाऊ लागली. त्यानंतर रवींद्र भवनात गायन, सतारवादन, हार्मोनियमवाद अशा उपक्रमांत सहभाग घेतला.

सतारवादनाच्या कार्यशाळा असायच्या. तिथेच कीर्तन शिबिर असायचे. त्‍यामुळे कीर्तनाची आवड निर्माण झाली. उदयबुवा फडके यांच्याकडे कीर्तनाचे धडे घेतले आणि नंतर सुरू झाला माझा कीर्तनप्रवास, असे प्रज्‍वलिता यांनी सांगितले. वर्तमानपत्रांत लेखन केले, रेडिओ केंद्रावरही काम केले, असेही त्‍यांनी स्‍पष्‍ट केले.

प्रज्‍वलिता सांगतात, बायांनो, कधीच आयुष्यात कायमस्वरूपी सुख मिळत नाही. दुःख माणसाच्‍या जीवनात असतंच. म्हणून त्यात होरपळून जाऊ नये. हळूहळू त्‍यातून बाहेर येऊन आपण आपल्या जीवनाचे सार्थक करून घेतले पाहिजे.

कठीण प्रसंगातून सावरत मी दोन्ही मुलांना उत्तम शिक्षणही दिले. भाऊ सागर जावडेकर याच्यामुळे विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देऊन स्वत:ची वेगळी प्रतिमा समाजात तयार केली.

विपुल लेखन. प्रवचन, संगीत, सामाजिक, शैक्षणिक, सांस्‍कृतिक, आध्यात्मिक उपक्रमांत सहभाग घेतला. हस्तकला, सूत्रनिवेदन, भरतकाम, विणकाम केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Reis Magos: रेईश मागूशमधील प्रकल्प DLF ने गुंडाळला? ‘रेरा’कडे नोंदणी मागे घेण्यासाठी अर्ज; 80 बंगल्यांची नोंदणी होणार रद्द

Advalpal: अडवलपालमध्ये नळांद्वारे दूषित पाण्याचा पुरवठा! स्थानिकांचे आरोग्य धोक्यात; ‘फोमेंतो’मुळे समस्या उद्भवल्याचा संशय

Amthane Dam: भर पावसातही ‘आमठाणे’ कोरडे! धरणात 5 टक्केच पाणी; पर्यटनावरही परिणाम

UTAA: प्रकाश वेळीपना धक्‍का! ‘उटा’च्या विद्यमान समितीवर निर्बंध; सभा-आर्थिक व्‍यवहार करण्यास मनाई

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

SCROLL FOR NEXT