'गोमन्तक'ने हाती घेतलेल्या या जनमन उत्सव (Janman Utsav) उपक्रमाचे त्यांनी मनापासून कौतुक केले.  Dainik Gomantak
गोवा

मुरगावात 'जनमन उत्सव' सर्वेक्षणाचे महिलांकडून कौतुक

महिलांना त्यांचे स्वतःचे असे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी 'गोमन्तक'ने (Gomantak) हाती घेतलेल्या या उपक्रमाचे त्यांनी मनापासून कौतुक केले.

दैनिक गोमन्तक

मडगाव: महिलांच्या आशा- आकांक्षा जाणून घेऊन त्यांना मूर्त रूप देण्यासाठी एक आराखडा तयार करून त्यानुसार पुढे काम करण्याच्या उद्देशाने 'गोमन्तक'ने सुरू केलेल्या जनमन उत्सव (Janman Utsav) उपक्रमाअंतर्गत मुरगाव (Murgaon) मतदारसंघात चालू असलेले सर्वेक्षण सध्या अंतिम टप्प्यात आहे. आज सासमोळे बायणा येथील महिलांनी या सर्वेक्षणात सहभाग घेऊन आपली मते नोंदविली.

काल बुधवारी काटे-बायणा येथील बूथ क्रमांक 22 वर झालेल्या सर्वेक्षणात स्थानिक महिला मंडळाच्या जयश्री कुमठेकर सहभागी झाल्या होत्या. महिलांना त्यांचे स्वतःचे असे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी 'गोमन्तक'ने हाती घेतलेल्या या उपक्रमाचे त्यांनी मनापासून कौतुक केले.

यापूर्वी कुठ्ठाळी आणि दाबोळी • या दोन मतदारसंघांत हे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. केपे मतदारसंघात सर्वेक्षण पूर्ण संपल्यानंतर आजपासून कुडचडे मतदारसंघात ते सुरू झाले. तेथील शेळवण या भागात आज झालेल्या सर्वेक्षणाला या भागातील महिलांनी चांगला प्रतिसाद दिला. यापूर्वी काणकोण मतदारसंघातही सर्वेक्षण करण्यात आले होते.

या सर्वेक्षणातून राज्यातील सुमारे तीन लाख महिलांची मते नोंदवून घेऊन एक व्यापक आराखडा तयार करण्याच्या उद्देशाने सर्व मतदारसंघांत सर्वेक्षण होणार आहे. सध्या कुडतरी मतदारसंघातही सर्वेक्षण सुरू आहे. काल आणि आज असे दोन दिवस घोगळ हाऊसिंग बोर्ड येथील महिलांनी त्यात सहभाग घेऊन आपली मते नोंदविली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT