Molestation of Woman in Goa Dainik Gomantak
गोवा

Lotulim Crime: गोव्यात धावत्या बसमध्ये युवतीचा विनयभंग! संशयिताविरुद्ध गुन्हा नोंद

गोमन्तक डिजिटल टीम

मडगाव: धावत्या बसमध्ये विनयभंगाची घटना घडली असून या संशयित आरोपीविरुद्ध पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. लोटली ते आर्लेम दरम्यान धावणाऱ्या बसमध्ये ही घटना घडलेली आहे.

या प्रकरणातील पीडित युवतीचे तसेच संशयित आरोपीचे नाव मायणा-कुडतरी पोलिसांनी सध्या राखून ठेवलेले आहे. बसमध्ये संशयित आरोपी पीडित युवतीच्या जवळ असलेल्या सीटवर बसला आणि त्याने तिच्या शरीराला जाणूनबुजून स्पर्श केला.

इतकेच नव्हे, तर या संशयिताने अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. संशयिताने धावत्या बसमध्ये केलेल्या या प्रकाराने सदर युवती भांबावून गेली. त्यानंतर तिने मायणा-कुडतरी पोलिस स्थानकात झाल्याप्रकाराबद्दल पोलिस तक्रार केली. या प्रकरणात तथ्य असल्याचे पाहून मायणा -कुडतरी पोलिसानी भारतीय न्याय संहितेच्या ७४, ७५(२) कलमाखाली गुन्हा नोंद केला असून पोलीस उपनिरीक्षक प्रशांत भगत या प्रकरणी तपास करीत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'..नेहमी इथेच राहावेसे वाटते'! ऑस्ट्रेलियन सेलिब्रिटी शेफ 'सारा' गोव्याच्या प्रेमात

CJI Dr. D.Y Chandrachud: आता कोकणीसह मराठीत होणार सुप्रीम कोर्टाच्या निवाड्यांचे अनुवादन; CJI चंद्रचूड यांचं गोव्यात मोठं वक्तव्य

गोव्यासाठी गौरवाची बाब! जागतिक स्तरावरील प्रभावशाली शास्त्रज्ञांच्या यादीत डॉ. शैलेंद्र गुरव

CJI D. Y. Chandrachud: प्रत्येकवेळी गोव्यात आल्यावर खास वाटतं.. CJI चंद्रचूड यांनी देशातील बेस्ट निसर्ग सौंदर्य म्हणत केलं कौतुक

Mumbai Goa Highway: कॅलिफोर्नियासारखा होणार मुंबई - गोवा सुपरहायवे; 26,000 कोटींच्या मरीन महामार्गाचे काम सुरु

SCROLL FOR NEXT