Goa Crime News Dainik Gomantak
गोवा

Goa Crime News: डिचोलीत महिलेचा विनयभंग; अद्याप कारवाई न केल्याने कॉंग्रेसची पालिकेवर धाड

डिचोली गट काँग्रेससह महिला विभागाने पालिकेवर धडक देत जाब विचारला

दैनिक गोमन्तक

Goa Crime News: कचरा गोळा करणाऱ्या पालिकेच्या एका स्वच्छता कामगाराकडून डिचोलीत एका महिलेचा विनयभंग करून तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा अयशस्वी प्रयत्न केल्याची धक्कादायक माहिती काही दिवसांपूर्वी समोर आली. या प्रकारामुळे पालिकेत खळबळ माजली आहे.

नंतर अद्याप पालिकेने या प्रकरणात कोणतीच करवाई न केल्याने डिचोली गट काँग्रेससह महिला विभागाने पालिकेवर धडक देत जाब विचारला.

संपूर्ण प्रकरण असे की...

एका घरात ‘केअर टेकर’ म्हणून काम करणारी मूळ बंगालमधील एक विवाहित महिला घरात एकटी असल्याची संधी साधून तिचा विनयभंग करून तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न संबंधित कामगाराने केल्याचा संशय आहे.

पीडित महिलेने आरडाओरड करताच आणि सीसीटिव्ही कॅमेरा असल्याचे लक्षात येताच, संशयित कामगाराने घराजवळील संरक्षक भिंतीवरून उडी मारून तेथून काढता पाय घेतला.

संरक्षक भिंतीवरून उडी मारून संशयित कामगार तेथून जात असल्याचे दृश्‍यही सीसीटिव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. पीडित महिलेने पालिकेत येऊन अधिकाऱ्यांकडे तक्रार करताच, अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली. मात्र अद्याप ठोस पावले उचलली नसल्याने कॉंग्रेसने याबाबत जाब विचारत कारवाईची मागणी केली. तसेच या संदर्भात निवेदन सादर केले आहे.

हा प्रकार डिचोली पालिका क्षेत्रातील प्रभाग-14 मधील एका वसाहतीत घडला आहे. मूळ बंगाल येथील पीडित महिलेने पालिकेत तक्रार दाखल करताच, ज्या कामगारावर संशय आहे, त्याला सध्या तरी कामावर न येण्याची ताकीद पालिकेने दिली.

संबंधित महिलेने मात्र, अद्याप पोलिसांत तक्रार केलेली नाही. सध्या मात्र या प्रकाराची पालिकेत जोरदार चर्चा चालू आहे. या प्रकारामुळे या प्रभागामधील महिलावर्गही भयभीत झाला आहे. त्यांनी या गोष्टीचा धसका घेतला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT