Vasco Hit And Run Case Dainik Gomantak
गोवा

Vasco Hit And Run Case: भरधाव कारच्या धडकेत महिला ठार, फरार तरूणाला दाबोळीत अटक

अपघात झाल्यानंतर कार चालकाने घटनास्थळावरून पळ काढला.

Pramod Yadav

Vasco Hit And Run Case: गोव्यात अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. भरधाव कारच्या धडकेत महिलेचा मृत्यू झाल्याची एक घटना आज समोर आली. वास्को येथील शांतीनगर येथे शुक्रवारी (दि.20) दुपारी ही घटना घडली.

दरम्यान, अपघात झाल्यानंतर कार चालकाने घटनास्थळावरून पळ काढला. वास्को पोलिसांनी (Vasco Police) संशयित कारचालकाचा पाठलाग करून त्याला दाबोळी जवळ अटक केली आहे. अपघाताच्या काही वेळातच पोलिसांनी कारचालकाला अटक केली. रजिया मुजावर (वय 69) असे या अपघातात मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे.

अमर हरमलकर (वय 24, रा. सडा) असे या संशयित कार चालकाचे नाव आहे. अमर याने अपघातानंतर पळ काढला होता, दरम्यान, पोलिसांनी त्याचा पाठलाग करून जयरामनगर दाबोळी (Dabolim) येथे त्याला अटक केली.

दरम्यान, शांतीनगर येथे महिलेला रस्त्यात जोराची धडक दिल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. यावेळी कारचालक प्रचंड वेगाने गाडी चालवत होता. असे स्थानिकांनी सांगितले. धडक दिल्यानंतर कारचालकाने घटनास्थळावरून पळ काढला.

दरम्यान, 18 जानेवार रोजी राज्यात एकूण पाच अपघात झाले व या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला. पर्रा-साळगाव, लिंगाभाट-पर्रा, गुळे-आगोंद, नावेली या ठिकाणी हे अपघात झाले. त्यानंतर दोनच दिवसांत झालेल्या अपघातात एका महिलेने आपला जीव गमावला आहे.

गोवा पोलिस वाहतूक खाते (Goa Police) आणि सरकारकडून राज्यातील अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी उपाययोजना केली जात आहे. तरीही अपघातांचे प्रमाण काहीकेल्या कमी होताना दिसत नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rashi Bhavishya 09 November 2024: नवीन काम हाती घेण्याच्या विचारात असाल तर आजचं भविष्य नक्कीच जाणून घ्या !!

Cash For Job Scam: मंत्री, आमदारांचे कॉल रेकॉर्ड तपासा; सरकारी नोकरी घोटाळ्याप्रकरणी 'आप'ने सत्ताधाऱ्यांनाच घेरले

Cash For Job Scam: नोकऱ्यांचा लिलाव

Cash For Job Scam: वकिलांनाही पूजानं घातला लाखोंचा गंडा; मामलेदाराच्या नोकरीचं दिलं आमिष

Goa News Updates: कळंगुटमध्ये एफडीएची धडक कारवाई, निकृष्ट काजू जप्त; वाचा दिवसभरातील घडामोडी

SCROLL FOR NEXT