Goa Woman Journalist Attacked in Manali Dainik Gomantak
गोवा

Goa Woman Attacked: गोव्यातील महिला पत्रकाराला मनालीमध्ये गुंडांकडून मारहाण?

20 जणांच्या जमावाने हल्ला केल्याचा आरोप

गोमंतक ऑनलाईन टीम

Goa Woman Journalist Attacked in Manali: गोव्यातील एका महिला पत्रकाराला मनाली येथे मारहाण झाल्याची माहिती आहे. 20 लोकांनी महिला पत्रकारासह तिच्या पतीवर हल्ला केल्याची माहिती आहे.

मनाली येथील डीएसपी के. डी. शर्मा यांच्या हवाल्याने हिंदी प्रसारमाध्यमांनी याबाबतचे वृत्त दिले आहे. या प्रकरणी मनाली पोलिसांनी एफआयआर दाखल केल्याचेही समजते.

मारहाण झालेली महिला काणकोण, दक्षिण गोवा येथील रहिवाशी असल्याची माहिती संबंधित हिंदी बातमीत दिलेली आहे. महिलेने दिलेल्या तक्रारीवरून महिलेला मारहाण करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.

संबंधित महिलेने, ती एक पत्रकार असून 28 मार्च 2023 पासून मनालीमध्ये वास्तव्यास असल्याचे म्हटले आहे. तिच्या पतीने वशिष्ठ मंदिरासमोरील गल्लीत स्कूटी पार्क केली होती. तेव्हा तेथील एका व्यक्तीने येथे दुचाकी पार्क करण्यास विरोध केला.

तेव्हा महिलेच्या पतीने दुचाकी पार्किंगसाठी दुसरी जागा शोधली. यावेळी पांढरा शर्ट घातलेल्या तरूणाने तिला शिवीगाळ करून मारहाण केली. असे महिलेने तक्रारीत म्हटले आहे.

पती तिथे आल्यावर संबंधित व्यक्तीने पतीसोबतही भांडण केले. यावेळी मारहाणीत पतीला दुखापत झाली आहे. स्थानिक लोकांनी स्थानिक गावकरी माझ्याशीच भांडू लागले. सुमारे 20 लोकांनी मारहाण केली, अशी माहिती महिलेने मनाली पोलिसांना दिली आहे.

दरम्यान, डीएसपी के. डी. शर्मा यांनी पोलिसांकडून पुढील कारवाई सुरू आहे. सार्वजनिक ठिकाणी शांतता भंग करणाऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत सोडले जाणार नाही, असे म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Education Astrology: ज्योतिषशास्त्रानुसार या 5 राशींचे लोक असतात 'पुस्तकी किडे'; अभ्यासात नेहमीच मिळवतात मोठे यश

Leopard Attack: शिगावात रात्री बिबट्याची दहशत, कुत्र्यांचा पाडला फडशा; वनअधिकाऱ्यांनी केली पाहणी

Goa Education: कितीही विषय अनुतीर्ण, विद्यार्थ्यांना 5 व्या सत्रात मिळणार प्रवेश; गोवा विद्यापीठाचे परिपत्रक

Goa Assembly Live: 'पीओपी' गणेशमूर्ती; पर्यावरण खात्याचे महत्त्वपूर्ण निर्देश

Dhirio Goa: बंदी असूनही सोशल मीडियावर 'धीरयो'ची खुलेआम जाहिरात! उच्च न्यायालयाकडून दखल; कारवाईचे निर्देश

SCROLL FOR NEXT