Bicholim Accident News Dainik Gomantak
गोवा

Bicholim Accident: अपघात कुणामुळे? डिचोली बसस्थानकापाशी वादावादीमुळे वाहतूक खोळंबली

Bicholim News: डिचोलीत विविध भागात सध्या लहानसहान अपघातांचे सत्र चालूच आहे; दोन दुचाकीमध्ये झालेल्या अपघातात एक महिला जखमी

गोमन्तक डिजिटल टीम

Accident Near Bicholim Bus Stand

डिचोली: डिचोलीत विविध भागात सध्या लहानसहान अपघातांचे सत्र चालूच आहे. शहरातील बसस्थानकाजवळ दोन दुचाकीमध्ये झालेल्या अपघातात एक महिला जखमी झाली. हा अपघात रात्री उशिरा घडला.

अपघातानंतर अपघातस्थळी मोठी गर्दी जमली. अपघातावरून बराचवेळ वादविवाद झाल्यानंतर प्रकरण आपापसात मिटवण्यात आले. यासंबंधीची माहिती अशी की, एक दाम्पत्य स्कुटरवरून बंदरवाडामार्गे बसस्थानका जवळील मुख्य रस्त्यावर येत असता, तेथील वळणावर समोरून येणाऱ्या अन्य एका दुचाकीची बंदरवाडामार्गे येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक बसली. त्याबरोबर या स्कुटरच्या मागे बसलेली महिला रस्त्यावर पडली.

तिच्या पायाला मार लागला. अपघातानंतर लगेच घटनास्थळी मोठी गर्दी जमली. अपघातास कारणीभूत कोण? यावरून बराचवेळ वादविवाद झाल्यानंतर प्रकरण हातघाईपर्यंत आले होते. मात्र नंतर काहीनी मध्यस्थी केल्यानंतर प्रकरण मिटले. तोपर्यंत बंदरवाडा रस्त्यावरील वाहतूक काहीवेळ खोळंबून राहिली. जखमी महिला ही मुस्लिमवाडा परिसरातील असल्याची माहिती मिळाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Thailand Cambodia Conflict: 32 ठार, 58 हजार स्थलांतरीत; थायलंड-कंबोडिया सीमेवरील तणाव, न्यूयॉर्कमध्ये बंद दाराआड बैठक

Quepem: भले मोठे झाड कोसळले, घराच्या 6 खोल्या जमीनदोस्त; केपेतील दुर्घटनेत मोठ्या प्रमाणात नुकसान

Goa Monsoon Flowers: 'सोनेरी हरणा, गुलाबी तेरडे, शुभ्र तुतारी'! श्रावणातील फुलांचा अवर्णनीय सोहळा

Khazan Farming: गोव्यातील शेकडो वर्षांपूर्वीची परंपरा धोक्यात! खारफुटींचे अतिक्रमण वाढले; खाजन शेती मरणासन्न

Bicholim Murder: डिचोलीत 5 जणांचे खून! परप्रांतीयांचा संबंध चिंताजनक; मारेकरी पोलिसांच्या ताब्यात

SCROLL FOR NEXT