Goa Accidents Canva
गोवा

Sanquelim Accident: ‘स्पीडब्रेकर’मुळे गेले चालकाचे नियंत्रण! मोटरसायकलवरून पडून महिला जखमी, निष्काळजीपणा भोवला

Sanquelim Speed Breaker Accident: डिचोली-साखळी रस्त्यावर ‘स्पीडब्रेकर’मुळे धावत्या मोटरसायकलवरून मागे बसलेली महिला पडून जखमी झाली. या अपघातात सुरेखा कुंभार ही महिला सुदैवाने बचावली खरी, मात्र हातापायासह तोंडाला मार लागला. हा अपघात आज (शुक्रवारी) सकाळी डिचोली-साखळी रस्त्यावरील कुळण येथे घडला.

गोमन्तक डिजिटल टीम

Sanquelim Bicholim Road Accident

डिचोली: डिचोली-साखळी रस्त्यावर ‘स्पीडब्रेकर’मुळे धावत्या मोटरसायकलवरून मागे बसलेली महिला पडून जखमी झाली. या अपघातात सुरेखा कुंभार ही महिला सुदैवाने बचावली खरी, मात्र हातापायासह तोंडाला मार लागला. हा अपघात आज (शुक्रवारी) सकाळी डिचोली-साखळी रस्त्यावरील कुळण येथे घडला.

गतिरोधकाचा अंदाज आला नसल्याने मोटारसायकल चालकाचे नियंत्रण गेले आणि हा अपघात घडला असून याला सर्वस्वी सार्वजनिक बांधकाम खात्याचा निष्काळजीपणा जबाबदार असल्याचे स्पष्ट झाले आहे. अपघातात जखमी खांडेपार येथील सुरेखा कुंभार या डिचोली मामलेदार कार्यालयातील कर्मचारी आहेत, अशी माहिती मिळाली आहे.

सुरेखा कुंभार या साखळी येथून लिप्ट घेऊन एका मोटारसायकलवर बसून डिचोलीत येत होत्या. कुळण येथील गतिरोधकाचा अंदाज आला नसल्याने वेगात असलेल्या मोटरसायकलला गतिरोधकावर गचका बसला. त्याबरोबर मागे बसलेल्या सुरेखा या तोल जाऊन रस्त्यावर पडल्या. गोमन्तकचे प्रतिनिधी तुकाराम सावंत यांनी जखमी महिलेला आपल्या मोटारगाडीतून डिचोलीच्या सामाजिक आरोग्य केंद्रात नेले.

निष्काळजीपणा जबाबदार

अपघात घडला त्यावेळी अपघातास कारणीभूत ठरलेल्या गतिरोधकावर सफेद पट्टे नव्हते. त्यामुळे मोटारसायकल चालकाला या गतिरोधकाचा अंदाज आला नाही. अचानक ब्रेक लावताच मागे बसलेल्या सुरेखा तोल जाऊन खाली पडल्या. मिळालेल्या माहितीनुसार गुरुवारी रात्री कुळण परिसरात रस्त्यावरील काही भागात हॉटमिक्स डांबरीकरण आले आहे. त्यावेळी दोन ठिकाणी नव्याने गतिरोधक घालण्यात आले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

Ranji Trophy 2026: बडोद्याकडून पराभवाचा झटका; मोहित रेडकर, दीपराज गावकर यांना गोव्याच्या रणजी संघातून डच्चू!

महिंद्राची नवी CNG SUV बाजारात; 9.99 लाखांपासून किंमत, दमदार लूकसह टाटा नेक्सॉन आणि ब्रेझाला देणार टक्कर

Ranji Trophy 2026: पिठिया-भार्गवच्या फिरकीपुढे गोव्याची शरणागती! बडोद्याचा डाव व 135 धावांनी दणदणीत विजय

SCROLL FOR NEXT