Woman from Goa repairs leather instruments with her husband  Dainik Gomantak
गोवा

नवऱ्याच्या हातात हात घालून "ती" करतेय वाद्ये दुरुस्ती

घरसंसाराचा प्रपंच सांभाळताना अनेक महिला आपल्या जोडीदाराच्या हातात हात घालून कार्यरत आहेत.

तुकाराम सावंत

डिचोली: शिक्षणासह कला, क्रीडा आदी प्रत्येक क्षेत्रात आज महिला पुढे येत आहेत. त्याची अनेक उदाहरणे समाजासमोर आहेत. घरसंसाराचा प्रपंच सांभाळताना अनेक महिला आपल्या जोडीदाराच्या हातात हात घालून कार्यरत आहेत.या गोष्टीचा प्रत्यय सध्या डिचोली शहरात येत आहे. एक महिला चक्क आपल्या नवऱ्यासोबत चर्मवाद्ये दुरुस्ती करतानाचे बाजारात दिसून येत आहे.

चतुर्थीनिमित्त महाराष्ट्रातील पंढरपूर येथील सुनील बळवंत धुमाळ हे पारंपरिक चर्मवाद्ये दुरुस्ती कारागीर यंदाही डिचोली शहरात आले आले आहेत. जुन्या बाजारात घुमट, समेळ, तबला, पखवाज आदी चर्मवाद्ये दुरुस्ती करण्यात व्यस्त आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे सुनील यांच्या पत्नी मंदा याही आपल्या नवऱ्यासोबत वाद्ये दुरुस्ती करताना दिसून येत आहे. एखाद्या कसलेल्या कारगिराप्रमाणे मंदा या वाद्ये दुरुस्ती करीत आहेत.

चतुर्थी जवळ आली, की वडिलोपार्जित वाद्ये दुरुस्ती कला सांभाळून असलेले सुनील धुमाळ हे कारागीर जवळपास 50 वर्षांपासून गोव्यात येत आहेत. सुरवातीस म्हणजेच अकरा वर्षांचे असताना सुनील आपल्या वडील भावासमवेत येत होते. आता त्यांनी स्वतंत्र व्यवसाय सुरु केला असून, दरवर्षी चतुर्थीला दीड-दोन महिने असताना ते डिचोलीत येत आहे. सुनील यांना यांना या व्यवसायात त्यांच्या पत्नी मंदा यांची साथ मिळत आहे. गेल्या अठरा वर्षांपासून मंदा या आपल्या पतीसोबत गोव्यात येत आहेत. मंदा या वाद्य दुरुस्ती करण्यात पूर्णपणे पारंगत झाल्या आहेत. चर्मवाद्ये सहजपणे दुरुस्त करताना मंदा या डग्गा, तबला, पखवाज यांना शाई घालण्यातही पूर्ण पारंगत आहेत. या व्यवसायात आपल्याला आपल्या पत्नीची मोठी साथ मिळत आहे. 'कोविड' मुळे गेल्यावर्षी गोव्यात येणे शक्य झाले नाही. यापुर्वीची तुलनेत यंदा वाद्ये दुरुस्तीसाठी गणेशभक्तांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही. तरीदेखील विघ्नहर्त्या गणरायाचे कृपेने जे काय मिळते, त्याच्यावर आपण समाधानी आहे. असे सुनील धुमाळ म्हणतात.

"माहेरी वाद्ये दुरुस्ती कलेचा वारसा नाही, की या कलेचे आपण शिक्षण घेतलेले नाही. लग्न झाले आणि सासरी आल्यानंतर चूल आणि मुलांना सांभाळतानाच वेळ मिळेल तशी नवऱ्याला मदत करू लागले. हळूहळू आवड निर्माण झाली आणि ही कला अंगात कधी भिनली ते कळलेच नाही. आता कोणतेही चर्मवाद्य समोर आले, की त्याची दुरुस्ती अवघड वाटत नाही. वाद्य दुरुस्ती करतानाच गावी भरणाऱ्या जत्रेवेळी आपण नारळ विक्रीचाही धंदा करते."

-सौ. मंदा सुनील धुमाळ, पंढरपूर.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT