Goa Tourism: गोव्यात आंतरराष्ट्रीय क्रूझ पर्यटनाचा श्रीगणेशा! 'सेलिब्रिटी मिलेनियम'मधून 2000 प्रवासी दाखल

Goa international cruise tourism: आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनलचे काम लवकरच पूर्ण होत असल्याने गोव्याच्या पर्यटन क्षमतेला मोठी चालना मिळणार असल्याचे संकेत मिळाले आहेत
Goa tourism news
Goa tourism newsDainik Gomantak
Published on
Updated on

Goa cruise tourism: यंदाच्या पर्यटन हंगामातील पहिले आंतरराष्ट्रीय क्रूझ जहाज 'सेलिब्रिटी मिलेनियम' सोमवार (दि.२४) सुमारे २,००० प्रवाशांना घेऊन मुरगाव पोर्ट अथॉरिटी येथे दाखल झाले. या भव्य आगमनामुळे गोव्यातील क्रूझ पर्यटन हंगामाची सुरुवात अत्यंत उत्साही वातावरणात झाली आहे. तसेच, आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनलचे काम लवकरच पूर्ण होत असल्याने, गोव्याच्या पर्यटन क्षमतेला मोठी चालना मिळणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.

नवीन टर्मिनलमुळे पर्यटन वाढीची आशा

मुरगाव पोर्ट अथॉरिटीचे वाहतूक व्यवस्थापक जेरोम क्लेमेंट यांनी 'सेलिब्रिटी मिलेनियम'चे आगमन हे या हंगामाची सकारात्मक सुरुवात असल्याचे स्पष्ट केले.

क्लेमेंट म्हणाले की, आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनलचे काम अंतिम टप्प्यात आहे. हे टर्मिनल कार्यान्वित झाल्यानंतर गोव्याच्या क्रूझ पर्यटनाच्या क्षमतेत लक्षणीय वाढ होईल आणि येत्या काळात क्रूझ पर्यटनाचा विस्तार आणखी वाढेल.

पारंपरिक गोमंतकीय आदरातिथ्याने स्वागत

'सेलिब्रिटी मिलेनियम'मधील प्रवाशांचे गोव्याच्या पारंपरिक संस्कृतीनुसार भव्य स्वागत करण्यात आले.प्रवाशांचे स्वागत ब्रास बँडच्या दमदार सादरीकरणाने करण्यात आले, ज्यामुळे पोर्टवर उत्सवी वातावरण निर्माण झाले होते. विविध पर्यटन विभागाच्या अधिकाऱ्यांनी एकत्रितपणे या भव्य स्वागत समारंभाचे समन्वय साधले. टूर ऑपरेटर्सनी प्रवाशांना गोव्याचे सांस्कृतिक आणि नैसर्गिक सौंदर्य दाखवण्यासाठी अनेक स्थळदर्शन पॅकेजेस सादर केले.

Goa tourism news
Goa Tourism: गोव्याच्या दगडांवर लपलंय मोक्सी रॉक आर्ट; 'या' गावात दिसतात निओलिथिक युगाचे पुरावे

स्थानिक टॅक्सी ऑपरेटर्सला मोठा फायदा

क्रूझ जहाजाच्या आगमनामुळे स्थानिक टॅक्सी चालकांना चांगला व्यवसाय मिळाल्याचे दिसून आले. 'मुरगावचा राजा टुरिस्ट टॅक्सी युनियन'चे उमेश मांद्रेकर यांनी सांगितले की, हंगामातील पहिल्या क्रूझ जहाजाच्या आगमनामुळे टॅक्सी ऑपरेटर्सना चांगला व्यवसाय मिळाला. अशा प्रकारच्या क्रूझ भेटींमुळे स्थानिक चालक आणि ऑपरेटर्सच्या उपजीविकेला मोठा आधार मिळतो, असेही त्यांनी नमूद केले. पुढील महिन्यांमध्ये आणखी क्रूझ जहाजे गोव्यात येण्याची अपेक्षा असल्याने, पर्यटन क्षेत्रातील भागधारक यंदाचा हंगाम अत्यंत मजबूत राहील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com