Ponda Fraud News Dainik Gomantak
गोवा

Ponda Fraud News: बांधकामासाठीचे सिमेंट ब्लॉक्स पुरवतो सांगून फोंड्यात महिलेची लाखाची फसवणूक

फोंडा पोलिसांत संशयिताविरुद्ध तक्रार नोंदवण्यात आली आहे

Kavya Powar

Ponda Fraud News: बांधकामासाठीचे सिमेंट ब्लॉक्स पुरवतो, असे सांगून फोंड्यात एका महिलेला सुमारे लाख रुपयांना गंडवण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी फोंडा पोलिसांत संशयिताविरुद्ध तक्रार नोंदवण्यात आली आहे.

फोंड्यातील अनुपमा पाटील यांनी स्वतः उद्योजक व एका विद्यालयाचा मुख्याध्यापक असल्याची बतावणी करून नवीनकुमार असे नाव सांगणाऱ्या ठकसेनाकडे सिमेंट ब्लॉक्सची ऑर्डर दिली होती. मात्र नवीनकुमार याने अनुपमा पाटील यांच्याकडून गेल्या 3 ऑक्टोबर रोजी ऑनलाईन पद्धतीने एकूण 98 हजार 999 रुपये उकळले व महिलेला ठकवले.

फोंड्यात लोकांना टोळी सक्रिय

दरम्यान, गोव्यात काही दिवसांपूर्वी लोकांना लुटणारी पती-पत्नीची टोळी सक्रिय झाली होती. प्लॉट किंवा इमारतीत कमी किमतीत फ्लॅट देतो, असे सांगून राज्यात अनेकांना ठकवलेल्या विदिशा आणि विजयनाथ गावडे या दाम्पत्याला फोंडा पोलिसांनी अटक केली. नंतर त्यांना न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर केले असता एक दिवसाचा रिमांड वाढवला. तसेच डिचोली आणि वाळपईतही या दाम्पत्याविरोधात फसवणुकीचे गुन्हे दाखल केले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

नोंदणी न केलेले होम स्टे, हॉटेल्सवर कारवाई अटळ! सरकारी महसूल बुडविणाऱ्यांची गय नाहीच, पर्यटनमंत्र्यांचा थेट इशारा

Horoscope 28 Saptember 2026: करिअरला मिळणार गती, वैवाहिक जीवनात गोडवा वाढणार! आज 'या' राशींच्या नक्षत्रात चमकणार यशाचा तारा

History: सदाशिवगड ताम्रपट अन् गोव्यातील कदंब

South Africa Bar Shooting: बारमध्ये एन्जॉय करत होते लोक, अचानक अंदाधुंद गोळीबार; 17 जणांचा मृत्यू, 15 जखमी VIDEO

कुणबी साडीवर दावा कुणाचा?

SCROLL FOR NEXT