Jewellery Robbery Dainik Gomantak
गोवा

Jewellery Robbery: ओळखीचा फायदा घेत 75 वर्षीय वृद्धेला लुटले; सीसीटीव्हीमुळे महिला जेरबंद, 5 लाखांचे दागिने जप्त

Elderly Woman Robbery Goa: घरात एकट्याच असलेल्या ७५ वर्षीय वृद्धेला चाकूचा धाक दाखवून सुमारे पाच लाख रुपयांचे दागिने लुटणाऱ्या महिलेला कुंकळ्ळी पोलिसांनी अटक केली.

गोमंतक ऑनलाईन टीम

मडगाव: घरात एकट्याच असलेल्या ७५ वर्षीय वृद्धेला चाकूचा धाक दाखवून सुमारे पाच लाख रुपयांचे दागिने लुटणाऱ्या महिलेला कुंकळ्ळी पोलिसांनी अटक केली. घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि संशयितेच्या हालचालींचा माग घेत पोलिसांनी तिचा छडा लावला. संशयितेकडून चोरीचे सर्व दागिने हस्तगत करण्यात आले असून, तिने स्थानिक सोनाराला विकलेले दागिनेही पोलिसांनी जप्त केले आहेत, अशी माहिती पोलिस निरीक्षक डायगो डायस यांनी दिली.

दरम्यान, पोलिसांच्या माहितीनुसार, संशयित महिला मूळची वेळ्ळी येथील असून गेल्या आठ वर्षांपासून कुंकळ्ळी येथे वास्तव्यास आहे. दोन वर्षांपूर्वी ती कुटुंबासह भिवसा येथे राहत असल्याने जुडिथ आणि त्यांच्या घराची तिला माहिती होती. त्यामुळे तिने या माहितीचा वापर करून लुटीचा कट आखल्याचा पोलिसांचा संशय आहे. सुरुवातीला या गुन्ह्यात आणखी एक व्यक्ती सहभागी असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. मात्र, सीसीटीव्ही फुटेजमध्ये चोरीनंतर महिला एकटीच जात असल्याचे दिसून आले. तपासात या गुन्ह्यात तिचाच सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याचे निरीक्षक डायस यांनी सांगितले.

वृद्धेला बेडवर दाबले

ही घटना १९ नोव्हेंबर रोजी रात्री भिवसा-कुंकळ्ळी येथे घडली होती. जुडिथ डायस (७५) या वृद्ध महिला घरात एकट्याच असताना रात्री साडेसातच्या सुमारास त्यांना दरवाजाबाहेर कोणीतरी ओरडत असल्याचा आवाज आला. त्यांनी दरवाजा उघडताच संशयित महिलेने जबरदस्तीने घरात प्रवेश केला. जुडिथ यांना बेडवर दाबून धरत त्यांच्या अंगावरील सोन्याच्या बांगड्या, कानातले आणि सोनसाखळी हिसकावून घेतली. या झटापटीत त्यांच्या नाकाला दुखापत झाली. त्यांना उपचारांसाठी बाळ्ळी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Women Employment Schemes:16 सरकारी खाती, 60 योजना अन् 24 प्रशिक्षण संस्था; महिलांसाठी रोजगाराच्या नव्या संधी

कॅश व्हॅन लुटण्याचा डाव फसला अन् दरोडेखोर शिरले थेट सुपरमार्केटमध्ये, 25 जणांना ओलिस ठेवून केली 20 लाख डॉलरची मागणी; कोलंबियात थरार! VIDEO

Drug Case: कारमध्ये लपवला होता कोट्यवधींचा गांजा; पर्वरीत पोलिसांचा छापा, गुजरातचा युवक अटकेत

Goa Politics: 'मनोज परब प्रसिद्धीसाठी धडपडत आहेत'; विजय सरदेसाईंचा आरजीपी नेत्याला टोला

Ambulance Service: रुग्णवाहिका वेळेवर पोहोचत नाहीत? 108 सेवेतील त्रुटींवर आरजीपीचे आरोग्य खात्याला निवेदन

SCROLL FOR NEXT