Police arrest scam accused woman 
गोवा

गोवा, बँकॉकचे स्वप्न दाखवून भोळ्या भाबड्या वृद्धांची फसवणूक; 35 लाख उकळले, 10 वर्षानंतर महिलेला अटक

Raipur Chhattisgarh Fraud: फसवणूक झाल्याचे उघडकीस आल्यानंतर याप्रकरणी पोलिसांनी एफआयआर दाखल केली. दरम्यान, दोन्ही आरोपींनी फरार झाले.

Pramod Yadav

छत्तीसगढ: बँकॉक-गोव्याला पाठवण्याच्या नावाखाली एका टूर अँड ट्रॅव्हलिंग कंपनीने २० ते २५ वृद्धांची फसवणूक केली आहे. कंपनीचे कर्मचारी वृद्धांकडून ३५ लाख रुपये वसूल करुन फरार झाले. याप्रकरणातील संशयित महिलेला तब्बल १० वर्षांनंतर अटक करण्यात आली आहे. छत्तीसगढ राज्यातील रायपूर येथे ही घटना घडली.

याप्रकरणी अभिनव सोनी यांनी २०१५ मध्ये सिव्हिल लाईन्स पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. कमर एजाज अहमद आणि श्रद्धा राजपूत यांनी पंड्री बस स्टँडसमोरील श्याम प्लाझामध्ये इमाम टूर्स अँड ट्रॅव्हल्सच्या नावाने कार्यालय सुरु केले होते.

सिंगापूर, बँकॉक, हाँगकाँग, गोवा टूरच्या नावाखाली २० ते २५ वृद्ध लोकांकडून सुमारे ३५ लाख रुपये घेतले. दरम्यान, यातील नागरिकांना टूरला घेऊन न जाता फसवणूक केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.

फसवणूक झाल्याचे उघडकीस आल्यानंतर याप्रकरणी पोलिसांनी एफआयआर दाखल केली. दरम्यान, दोन्ही आरोपींनी फरार झाले. पोलिसांचा शोध सुरुच होता. सिव्हिल लाईन पोलिसांना याप्रकरणातील एकजण संशयित श्रद्धा राजपूत ढियारी परिसरात लपून बसल्याची माहिती मिळाली. यानंतर पोलिसांनी या परिसरात छापा टाकून संशयित महिलेला अटक केली.

संशयित महिला टूर कंपनीत अकाउंटंट म्हणून काम करायची. या प्रकरणातील मुख्य आरोपी अद्याप फरार आहे. पोलिसांनी त्याच्याविरुद्ध लूक-आउट सर्क्युलर जारी केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

"26 वर्षे देशाची सेवा केली, आता ओळख विचारताय?" निवडणूक आयोगाच्या नोटिसमुळे खासदार विरियातो संतापले

WPL 2026: गोमंतकीय क्रिकेटरचा ‘डब्ल्यूपीएल’मध्ये कल्ला! दिल्ली कॅपिटल्सला ठोकला रामराम; यूपी वॉरियर्ससोबत नवीन इनिंग

नोकरी सोडली, अयोध्येचे राम मंदिर बनवले; 108 ठिकाणी भ्रमंतीची केली भीष्मप्रतिज्ञा, तुमकूरमधील रामभक्ताची कहाणी

Goa Live News: "जिथे बोलणे कर्तव्य आहे, तिथे गप्प राहणे हा गुन्हा"; न्यायमूर्ती एम. एस. सोनक यांचे मार्मिक उद्गार

VIDEO: बाप के साये का असर होता है... रस्त्यावर खेळणी विकणाऱ्या वडिलांच्या पायाला धरुन झोपला चिमुकला; हृदयस्पर्शी व्हिडिओ व्हायरल Watch

SCROLL FOR NEXT