Counterfeit 500 Notes: सावधान! सासष्टीच्या बाजारात फिरतायेत 500 रुपयांच्या बनावट नोटा, व्यापारी त्रस्त

Goa Counterfeit 500 Notes: बाणावली येथील एका मद्यविक्रेत्याने ०१ मे रोजी याप्रकरणी कोलवा पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली आहे.
Counterfeit 500 Notes In Goa
500 Indian RupeesDainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव: सासष्टीच्या बाजारात पाचशे रुपयांच्या बनावट नोटा व्यवहारात वापरल्या जात असल्याचे समोर आले आहे. किनारी भागात प्रामुख्याने याचा वापर होत असून, यामुळे व्यापारी वर्ग त्रस्त झाला आहे. दोन हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्यानंतर देशात सध्या ५०० रुपये सर्वात मोठे चलन आहे.

बाणावली येथील एका मद्यविक्रेत्याने ०१ मे रोजी याप्रकरणी कोलवा पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली. मद्यविक्रेता दररोजचा हिशोब करत असताना त्याला ५०० रुपयांची बनावट नोट आढळून आली. सुरुवातीला ती नोट खरी असल्याचा त्याला वाटले पण, व्यवस्थित पडताळून पाहिले असता ती बनावट असल्याचे निष्पन्न झाले. यानंतर व्यापाराने पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली.

Counterfeit 500 Notes In Goa
Goa Stampede: '..अजूनही धोंड भक्तगणांचा आरडाओरडा ऐकू येत आहे'! लईराई दुर्घटनेतील प्रत्‍यक्षदर्शींनी सांगितला थरारक अनुभव

तक्रारीनंतर कोलवा पोलिसांनी याप्रकरणी तपास करण्यास सुरुवात केली आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. बनावट नोटा व्यवहात कोठून आल्या? कोणा मार्फत आल्या? याचा सध्या तपास घेतला जात आहे. दरम्यान, परिसरात बनावट नोटा व्यवहारात आल्याची शंक पोलिसांच्या वतीने व्यक्त करण्यात आली आहे. पोलिसांनी व्यापारी नागरिकांना याबाबत सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

Counterfeit 500 Notes In Goa
Leopard Caught: लोकवस्तीत येऊन कुत्र्यांचा, पाडसांचा फडशा पाडणारा बिबट्या जेरबंद! वनखात्याच्या प्रयत्नांना अखेर यश

लहान व्यावसायिक आणि इतर व्यापारांनी चलनांची देवाणघेवाण करताना नोटा तपासून घेण्याचे आवाहन केले आहे. तसेच, चलनात अशा बनावट नोटा आढळून आल्यास तत्काळ पोलिसांना याची माहिती देण्यात यावी, अशी सूचनाही पोलिसांनी केली आहे. दरम्यान, यामुळे व्यापारी वर्गाची चिंता वाढली आहे. विशेषत: रोखीने व्यवहार करणाऱ्या व्यापाऱ्यांची यामुळे डोकेदुखी वाढली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com