Goa Electricity Bill Scam 
गोवा

Goa Electricity Bill Scam: वीज बिल घोटाळा प्रकरणी साक्षीदार पुन्हा अनुपस्थित, सुनावणी परत एकदा तहकूब

वीज बिल घोटाळा प्रकरणी पुढील सुनावणी आता 19 जानेवारी रोजी होणार आहे.

सुशांत कुंकळयेकर

Goa Electricity Bill Scam: वीज बिल सवलत घोटाळा प्रकरणी मागील सुनावणीवेळी समन्स जारी केलेल्या पाच साक्षीदारांचे पत्ते सापडले नसल्याने समन्स मागे आले. त्यामुळे या प्रकरणाची सुनावणी पुन्हा एकदा तहकूब करण्याची पाळी दक्षिण गोव्याचे खास न्यायाधीश इर्शाद आगा यांच्यावर आली.

एका साक्षीदाराला व्हॉटसअपवर समन्स पाठवला होता. त्याने आपण मंगळूरला असल्याने पुढील तारीख देण्यास सांगितले. त्यामुळे शुक्रवारी एकही साक्षीदार उपस्थित नव्हता. याप्रकरणी पुढील सुनावणी आता 19 रोजी होणार आहे.

कथित वीज बिल घोटाळाप्रकरणी दक्षिण गोवा जिल्हा विशेष न्यायालयात शुक्रवारी सुनावणी झाली. या प्रकरणातून मंत्री माविन गुदिन्हो यांना कायमस्वरुपी अनुपस्थित राहण्याची सूट मिळाली आहे. त्यामुळे शुक्रवारी झालेल्या सुनावणीला ते उपस्थित नव्हते. तर टी. नागराजन व कृष्णकुमार हेही अनुपस्थित होते.

मागील 5 जानेवारीला झालेल्या सुनावणीवेळी यापूर्वी सुनावणीवेळी तिघा साक्षीदारांना उपस्थित राहण्यासाठी समन्स जारी केलेले होते. त्यांना पाठवलेले समन्स मागे आलेले नसल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर संबंधित तिघा साक्षीदारांना 19 जानेवारी रोजी न्यायालयात उपस्थित राहण्यासाठी समन्स जारी करण्यास सांगण्यात आलेले आहे.

तर शुक्रवारी सहा साक्षीदारांना उपस्थित राहण्याचे समन्स पाठवलेले होते. पण, त्यातील पाच साक्षीदाराचा पत्ता योग्य नसल्याने समन्स परत आले. तर एका साक्षीदाराला व्हॉटसअपवर समन्स पाठवण्यात आले. त्यांनी आपण मंगळूर येथे स्थलांतरीत झालेल्या सांगितले. तसेच सुनावणीला उपस्थित राहण्यासाठी पुढील तारीख देण्याची विनंती केली.

त्यानुसार याआधी तिघांना 19 जानेवारीला उपस्थित राहण्यास सांगण्यात आलेले असल्याने सदर साक्षीदारालाही त्याचदिवशी उपस्थित राहण्यास सांगण्यात आले. याप्रकरणी पुढील सुनावणी 19 जानेवारीला सकाळी 10 वाजता होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lessons from Animals: प्राण्यांकडूनही शिकता येतात जीवनाचे धडे! मुंग्यांची शिस्त, पक्ष्यांची मेहनत अन् निसर्गाची जादू

Bangladesh Resort Fire: बांगलादेशात रिसॉर्टला भीषण आग, 10 जणांचा होरपळून मृत्यू; जीव वाचवण्याची संधीच मिळाली नाही VIDEO

Trigrahi Yog 2026: ग्रहांच्या फेरबदलाचा मोठा चमत्कार! त्रिग्रही आणि बुधादित्य योगाच्या संयोगाने उजळणार 3 राशींचे भाग्य; होणार अफाट धनलाभ

INS Samarthak Warship: भारताची पहिली बहुउद्देशीय युद्धनौका 'समर्थक' नौदलात दाखल; सागरी सुरक्षा होणार अधिक मजबूत!

Hero च्या दोन नव्या बाइक्स लॉन्च! किंमत 1.27 लाखांपासून सुरू, क्रूझ कंट्रोलसह मिळणार अनेक भन्नाट फीचर्स

SCROLL FOR NEXT