Isidore Fernandes Dainik gomantak
गोवा

उमेदवारीची वाट न पाहता, इजिदोर फर्नांडीस यांची प्रचाराला सुरुवात

सद्या प्रचारासाठी वेळ कमी आहे त्यामुळे एक एक दिवस महत्वाचा

दैनिक गोमन्तक

भाजपच्या उमेदवारीची वाट न पाहता उपसभापती व काणकोणचे (Canacona) आमदार इजिदोर फर्नांडीस यांनी श्रीस्थळ, गावडोंगरी येथील श्री मल्लिकार्जुन व चावडी येथील सेंट तेरेजा सायबीणीचे दर्शन व साकडे घालून प्रचाराचा नारळ आज फोडला आहे. यावेळी त्याच्यासोबत भाजप मंडळ अध्यक्ष नंदीप भगत व अन्य भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.

भाजप (bjp) पक्ष उमेदवारी दोन तीन दिवसात जाहीर करण्याची शक्यता आहे. मात्र, सद्या प्रचारासाठी वेळ कमी आहे त्यामुळे एक एक दिवस महत्वाचा आहे. त्यासाठी प्रचाराचा नारळ फोडला आहे. प्रचाराची सुरूवात या पूर्वीच करण्यात आली आहे. मात्र आज श्रीस्थळ व गावडोंगरी येथील श्री मल्लिकार्जुन देवालय तसेच चावडी येथील सेंट तेरेजा चर्चमध्ये कार्यकर्त्यांसमवेत जाऊन देवाला गाऱ्हाणी घालून प्रचाराला सुरुवात केल्याचे, उपसभापती फर्नांडिस यांनी सांगितले.

या पूर्वीच उपसभापती फर्नांडीस यांनी निवडणूक लढविण्याची घोषणा केली होती. मात्र, भाजपची उमेदवारी न मिळाल्यास अपक्ष म्हणून निवडणूक (Election) लढविण्याची तयारी त्यांनी ठेवली आहे.

आज त्याच्या सोबत भाजप मंडळ अध्यक्ष नंदीप भगत,सचिव दामोदर च्यारी, युवा मोर्चाचे अध्यक्ष सतीश गोसावी, मंडळाचे अन्य सदस्य नगरसेविका नितू देसाई, शुभम कोमरपंत, धिरज नाईक गावकर, पैगीण जिल्हा पंचायत सदस्य शोभना वेळीप, लोलयेचे सरपंच सचिन नाईक, श्रीस्थळचे माजी सरपंच देवेंद्र नाईक, माजी नगराध्यक्ष समीर देसाई व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Porvorim Accident: पर्वरीत भरधाव दुचाकीची पादचाऱ्याला धडक; उपचारादरम्यान मृत्यू

Boeing 737 MAX विमानांना सॉफ्टवेअरचा 'धोका'; लँडिंगवेळी मार्गदर्शन प्रणाली बंद होण्याची शक्यता

El Nino Rabi Crops: 'एल निनो'चा रब्बीला मोठा फटका? केंद्रीय कृषी सचिवांचा इशारा; कोरडवाहू भागांसमोर संकट

ODI World Cup 2027 Schedule: क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! 2027 वनडे वर्ल्ड कपचं शेड्यूल 1 ऑक्टोबरला होणार जाहीर

Goa SIR: 'अल्पसंख्याकांना लक्ष्य केलेले नाही'; SIR वादावर मुख्यमंत्री सावंतांचा दावा, विरोधकांचे आरोप तथ्यहीन

SCROLL FOR NEXT