Mahesh Konadkar
Mahesh Konadkar  Dainik Gomantak
गोवा

Goa Panchayat: 24 तासांत मांद्रे सरपंचांवर ‘अविश्‍‍वास’ दाखल; आरोलकरांची सोपटेंवर कुरघोडी

दैनिक गोमन्तक

मोरजी: सरपंच-उपसरपंचपदाची निवड झाल्यानंतर 24 तासांच्या आतच मांद्रे पंचायत क्षेत्रात मोठा राजकीय भूकंप घडला. मांद्रेचे सरपंच महेश कोनाडकर यांच्यावर अविश्‍वास ठराव दाखल करण्यात आला. यामुळे माजी आमदार दयानंद सोपटे यांच्याकडे गेलेली पंचायत, पुन्हा आमदार जीत आरोलकर यांनी आपल्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला.

(Within 24 hours, a no-confidence motion was filed against Mahesh Konadkar, Sarpanch of Mandrem)

मांद्रे पंचायतीचे सरपंच म्हणून महेश कोनाडकर यांची सोमवारी सरपंचपदी निवड झाली होती. आज 23 रोजी गट विकास कार्यालयात यांनी पंच सदस्य म्हणून शपथ घेतल्यानंतर त्यांच्यावर एकूण सात पंच सदस्यांनी अविश्वास ठरावाची नोटीस दाखल केली. यामुळे मांद्रे पंचायत क्षेत्रातच नव्हे तर पेडणे तालुक्यात खळबळ उडाली.

मांद्रेचे सरपंच महेश कोनाडकर यांच्याविरोधात पेडणे गट विकास अधिकारी मनिष केदार यांच्याकडे अविश्वास ठरावाची नोटीस देताना प्रशांत नाईक, तारा हडफडकर, मैथिली अम्रोज, रॉबर्ट फर्नांडिस, किरण सावंत, मिशेल शेरॉन अमरोज फर्नांडिस अमित सावंत या सात पंच सदस्यानी सह्या केल्या आहेत. दरम्यान, या सर्व घडामोडींवर सरपंच महेश कोनाडकर यांनी याबाबत प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Donation: उल्‍हास वेर्लेकर कुटुंबियांकडून गोव्‍यातील दहा संस्‍थांना प्रत्‍येकी एक लाखाची देणगी

GI Tag For Goa's Urrak: मानकुराद, फेणी, बिबिंकानंतर आता हुर्राकला लवकरच मिळणार GI मानांकन

South Goa : दक्षिणेत काँग्रेसचा ७ हजारांच्‍या मताधिक्‍याने विजय शक्‍य; पक्षाच्या विश्‍लेषकांचा दावा

Bicholim News : खाण क्षेत्रातून गाव वगळा जनतेची मागणी ; मंदिरे, घरे, जलस्रोत धोक्‍यात

Parshuram Jayanti: प्रभू परशुरामाला गोमंतभूमी जनक का म्हटले जाते, काय आहे गोव्याशी संबंध?

SCROLL FOR NEXT