CM Pramod Sawnt: सोनाली फोगट यांच्या मृत्यूबाबत प्रमोद सावंत यांनी सोडले मौन!

सोनाली फोगट यांच्या निधनावर बोलताना गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले, "आम्ही या प्रकरणाला गांभीर्याने घेत आहोत.
Sonali Phogat
Sonali PhogatDainik Gomantak

गोवा: हरियाणातील प्रसिद्ध अभिनेत्री तथा भारतीय जनता पक्षाच्या नेत्या सोनाली फोगट (वय 42) यांचा काल मंगळवारी राज्यातील हणजुणे येथे तारांकित रिसॉर्टसमध्ये संशयास्पद मृत्यू झाला. सोनाली फोगट यांच्या निधनावर बोलताना गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले, "आम्ही या प्रकरणाला गांभीर्याने घेत आहोत. डीजीपी स्वतः देखरेख करत आहेत. तपास आणि पोस्टमॉर्टम रिपोर्ट त्यांच्याकडे येतील. प्राथमिक, डॉक्टर आणि डीजीपी यांच्या मते, हृदयविकाराचा झटका आला असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

(Goa CM Pramod Sawant explains about bjp leader Sonali Phogat's death)

Sonali Phogat
Crime News: अत्याचाराचा ठपका ठेवत उपनिरीक्षक पिंगे निलंबित

प्रथमदर्शनी ह्रदयविकाराच्या धक्क्याने त्यांचे निधन झाल्याचा अंदाज व्यक्त होत असला तरी मृत्यूबाबत संशय व्यक्त होत आहे. सोनालीचे नातेवाईक काल रात्री उशिरा हिस्सारहून गोव्यात पोहोचले असून आज शवचिकित्सेनंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल. दरम्यान, नातेवाईकांनी या घटनेची सीबीआय चौकशीची मागणी केली आहे.

हणजुणे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनाली फोगाट सोमवारी (ता.22) आपली मुलगी यशोधरा (15वर्षे) त्यांचे पीए सुधीर सांगवान आणि इतर दोन मित्रांसोबत पर्यटनासाठी गोव्यात आल्या होत्या. त्या हणजुणे येथील दी ग्रॅण्ड कर्लिस या हॉटेलमध्ये मुक्कामी होत्या. 24 ऑगस्टपर्यंत गोव्यात राहून त्यानंतर त्या मुंबईला जाणार होत्या. मात्र, तत्पूर्वी सोमवारी रात्री त्या एका नाईट क्लबमध्ये गेल्या होत्या. तेथून परतल्यानंतर पहाटे अस्वस्थ वाटू लागल्याचे इतरांना सांगितले. तशा अवस्थेत त्यांना हणजुणे येथीलच सेंट ॲन्थोनी या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

हरियाणात राजकीय वातावरण तापले

हरियाणातील सर्वात चर्चित मतदारसंघ म्हणून आदमपूरची नोंद आहे. येथून काही दिवसांपूर्वी माजी मुख्यमंत्री भजनलाल यांचे पुत्र कुलदीप बिष्णोई यांनी काँग्रेसच्या आमदारकीचा राजीनामा दिला. त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. तर दुसरीकडे सोनाली आदमपूरच्या भाजप उमेदवारीच्या मुख्य दावेदार आहेत. सध्या आदमपूरची पोटनिवडणूक लागली असून येथून भाजपने अद्याप कोणालीही उमेदवारी दिलेली नाही. मात्र, सोनाली यांच्या आकस्मिक मृत्यूने हरियाणात खळबळ माजली आहे. त्यामुळे तेथील राजकीय वातावरणही पेटलेले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com