Goa: Other corporators beside Dayesh Naik while speaking at the press conference  Dainik Gomantak
गोवा

Goa: केपे पालिकेतील ‘ते’ नऊ नगरसेवक कवळेकरांसोबत : दयेश नाईक

केपे पालिकेतील ‘ते’ नऊ नगरसेवक कवळेकरांसोबत आहेत. एल्टन डिकॉस्टा यांनी लोकांची दिशाभूल थांबवावी असे नगरसेवक दयेश नाईक यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.

Bhushan Aroskar

केपे: केपे नगरपालिकेत (Kepe Municipality) जे नऊ नगरसेवक बाबू कवळेकरांच्या (Babu Kavalekar) पाठिंब्यावर निवडून आले आहेत ते एकसंघ असून काँग्रेसचे संभाव्य उमेदवार एल्टन डिकॉस्टा जी लोकांची दिशाभूल करीत आहे ती त्यांनी त्वरित थांबवावी असे माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक दयेश नाईक यांनी केपे पालिकेत घेतलेल्या पत्रकार परिषदेत (press conference) सांगितले. यावेळी नगराध्यक्षा सुचिता शिरवईकर, उपनगराध्यक्ष विल्यम फर्नांडिस, नगरसेवक फिलू डिकॉस्ता, अमोल काणेकर, गणपत मोडक, चेतन हळदणकर, दीपाली नाईक व प्रसाद फळदेसाई हजर होते.

नाईक पुढे म्हणाले, आपण गेल्या वीस वर्षापासून काँग्रेस (Congress) पक्षाचे काम केले आहे असे एल्टन यांनी एका मुलाखतीत असे सांगितले. हे खोटे असून बाबू कवळेकरांच्या कार्यकाळात आम्ही काँग्रेसचे काम खऱ्या अर्थाने केले आहे. त्यावेळी एल्टन नव्हतेच व आता अचानकपणे लोकांसमोर येऊन लोकांची दिशाभूल करत असल्याने त्यांनी लोकांची माफी मागितली पाहिजे. आम्ही नऊही नगरसेवक कवळेकरांसोबत आहोत. आमच्यातील चार नगरसेवक अपक्ष (Independent) म्हणून निवडून आले आहेत असे जे एल्टन सांगत आहेत. तर त्या चार नगरसेवकांची नावे त्यांनी उघड करावी असे आव्हान नाईक यांनी एल्टन यांना दिले. आमदार कवळेकर यांनी अनेक विकास कामे केली असून त्यात प्रामुख्याने बोरीमळ बहुउद्देशीय क्रीडा प्रकल्प, प्राथमिक आरोग्यकेंद्राचे नूतनीकरण, कुशावती नदीवरील पूल (Bridge over Kushavati river) व केपे फिश मार्केट प्रकल्पाचे काम (Work on the Kepe Fish market project)अंतिम टप्प्यात आले आहे. पोलिसस्थानकाच्या कामालाही सुरवात झाल्याचे नगराध्यक्षा शिरवईकर यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

India Bike Week 2024: चित्तथरारक स्टंट, म्युझिक आणि बरंच काही...; गोव्यातील बाईक इव्हेंटच्या Date, Venue जाणून घ्या

Tribute to the Legends मिरामार किनारी सुदर्शन पटनाईक यांनी साकारले सिने जगतातील दिग्गजांचे Sand Art, पाहा फोटो

SCROLL FOR NEXT