Utpal Parrikar  Dainik Gomantak
गोवा

उत्पल पर्रीकर भाजपची 'ही' ऑफर स्वीकारणार का?

गोवा भाजप निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी उत्पल पर्रिकर याच्या उमेदवारी बद्दल मोठा खुलासा केला.

दैनिक गोमन्तक

पणजी: आगामी गोवा विधानसभा निवडणुकीसाठी मागील काही दिवसांपासून विविध राजकीय पक्ष उमेदवार जाहीर करत आहेत. एवढ्या दिवस शांत असलेल्या भाजपने आज त्यांची पहिली उमेदवार यादी जाहीर केली आहे. अपेक्षेप्रमाणे काही नेत्यांना पक्षाने संधी दिली तर काही नेत्यांच्या पदरात फक्त निराशाच पडली. या 34 उमेदवारांच्या यादीत मागील काही दिवसात चर्चेत असलेले उत्पल पर्रीकर यांचे नाव मात्र कुठेच दिसत नाही. (Utpal Parrikar Latest News)

यादी जाहीर केल्यानंतर गोवा भाजप (BJP) निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी उत्पल पर्रीकर याच्या उमेदवारी बद्दल मोठा खुलासा केला. ते म्हणाले, उत्पल पर्रिकर यांना पक्षाने 2 'ऑप्शन' दिले होते. त्यातील एक जागा त्यांनी अमान्य केली आहे. दुसऱ्या जागेबद्दल बोलणी सुरू आहे. मी आशा करतो की ही बोलणी सफल होईल. आम्ही सर्वजण पर्रिकर कुटुंबाचा आदर आणि सन्मान करतो.

जाहीर झालेल्या यादीतून हे स्पष्ट होते की उत्पल पर्रीकर याचे भाजपचा उमेदवार म्हणून पणजीमधून निवडणूक लढवण्याचे स्वप्न आता स्वप्नच राहिले आहे. मात्र भाजपने उत्पल पर्रीकर (Utpal Parrikar) यांना डिचोलीमधून तिकिट देण्याची तयारी दाखवली आहे, अशी माहिती समोर येत आहे. डिचोलीचे विद्यमान आमदार आणि गोवा विधानसभेचे अध्यक्ष राजेश पाटणेकरांची सीट आहे. पाटणेकर निवडणूक लढण्यास इच्छुक नसल्याचं सांगण्यात येत आहे. ही भाजपची स्ट्रॉंग सीट आहे. उत्पल पर्रिकर भाजपची ऑफर स्वीकारणार की पणजीमधून लढण्यासाठी भाजप विरोधी पक्षांचा हात धरणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Bike Stunt Video: काळजाचं पाणी करणारा थरारक स्टंट! पठ्ठ्याचा डोकं चक्रावणारा व्हिडिओ व्हायरल; जीवाची लावली बाजी

Shani Gochar 2026: शनिदेव देणार 5 राशींना श्रीमंतीचं वरदान! हाती लागणार कुबेराचा खजिना; करिअरला मिळणार नवा बूस्ट

Colvale Jail Employee Stress: अभद्र युतीमुळे प्रामाणिक कर्मचाऱ्यांचा गुदमरतोय जीव! सुधारगृह गुन्हेगारांचा अड्डा; मानसिक आरोग्य कक्ष व छळविरोधी समित्यांची तातडीची मागणी

Crime News: आधी विषारी कोल्ड्रिंक पाजले, मग गळा आवळून केला खून! 20 वर्षांच्या संसारानंतर बायकोनेच नवऱ्याचा काढला काटा; कारण ऐकून व्हाल अवाक

Jitesh Kamat Colvale Jai: कोलवाळ मध्यवर्ती कारागृहाची सद्यस्थिती पाहता, 'गुन्हेगारांना आलिशान सुविधा पुरवणारे हॉलिडे होम' - जितेश कामत

SCROLL FOR NEXT