Congress
Congress Dainik Gomantak
गोवा

गोवा विधानसभा निवडणुकीसाठी TMC आणि Congress एकत्र येणार का?

दैनिक गोमन्तक

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी सोमवारी पी. चिदंबरम आणि पक्षाचे सरचिटणीस (संघटन) के.सी. वेणुगोपाल यांच्यासह वरिष्ठ नेत्यांसोबत गोव्यातील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाच्या तयारीचा आढावा घेतला. कॉंग्रेस आणि गोवा फॉरवर्ड पार्टी (Goa Forward Party) यांची युती झालेली आहे. यामध्ये आता तृणमूल काँग्रेस सामील होणार का, या चर्चेला राजकीय वर्तुळात उधाण आले आहे. (Goa Assembly Election Latest News)

तृणमूल काँग्रेसच्या (TMC) गोवा प्रभारी आणि लोकसभा सदस्य महुआ मोईत्रा यांनी आपला पक्ष गोवा फॉरवर्ड पार्टी आणि काँग्रेससोबत युती करण्यास तयार असल्याचे सूचित केले आहे. त्या नंतरच गांधी यांनी ही बैठक घेतली.

तृणमूल काँग्रेस आणि कॉंग्रेसच्या युतीच्या चर्चेला पूर्णविराम लावत वेणुगोपाल यांनी सोमवारी उशिरा गांधी यांच्या भेटीनंतर ट्विट केले. ते लिहितात, श्री @RahulGandhi यांनी आजच्या बैठकीत TMC सोबत संभाव्य युतीची चर्चा केल्याची अफवा पूर्णपणे निराधार आणि असत्य आहे.आम्ही गोव्याला लवकरच प्रगतीच्या मार्गावर आणू.”

मात्र, तृणमूलच्या मोईत्रा यांना प्रत्युत्तर देताना, गोव्याचे ज्येष्ठ निवडणूक निरीक्षक श्री. चिदंबरम म्हणाले होते की, काँग्रेस स्वबळावर भाजपला (BJP) पराभूत करण्यास सक्षम आहे परंतु कोणत्याही पक्षाला भाजपचा पराभव करण्यासाठी काँग्रेसला पाठिंबा द्यायचा असेल तर मी का नाही म्हणू ?"

गोव्यात 40 विधानसभा जागा आहेत. आतापर्यंत काँग्रेसने 15 उमेदवारांची घोषणा केली आहे. कॉंग्रेस ही निवडणूक विजय सरदेसाई यांच्या गोवा फॉरवर्ड पार्टी (GFP) सोबत लढणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: लोकांचा भाजपविरोधातील राग व्यक्त, दोन्ही जागा जिंकण्याचा इंडिया आघाडी दावा

Yellow Alert In Goa: गोव्यात पुढील सहा दिवस पावसाची शक्यता, दोन दिवसांसाठी 'यलो अलर्ट'

Donation: उल्‍हास वेर्लेकर कुटुंबियांकडून गोव्‍यातील दहा संस्‍थांना प्रत्‍येकी एक लाखाची देणगी

Chhattisgarh: छत्तीसगडमधील बिजापूरमध्ये सुरक्षा दलाची मोठी कारवाई; 12 नक्षलवादी ठार!

Brij Bhushan Sharan Singh: ब्रिजभूषण शरण सिंह यांना मोठा झटका; कोर्टाने लैंगिक छळाचे आरोप केले निश्चित

SCROLL FOR NEXT