पणजी: राज्य सरकारने (Goa Government) लागू केलेले कडक निर्बंध कायम असतानाही राज्यात कोरोना (Covid-19) रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. सक्रिय रुग्णांची संख्या आता 10 हजार 139 झाली असून पॉझिटिव्हिटी दर 27.38 टक्क्यांवर पोहचला आहे. गेल्या चोवीस तासांत राज्यात 1592 नवे रुग्ण आढळून आले आहेत. आणखी दोन ओमिक्रॉनचे (Omicron) रुग्ण आढळल्याने चिंता वाढली आहे. राज्यात ओमिक्रानबाधितांची संख्या 21 वर पोहचली आहे.
दुसरीकडे, राज्यातील 11 लाख 25 हजार 58 नागरिकांनी कोरोनाचे दोन्ही डोस घेतले असून त्याची टक्केवारी 96 टक्के इतकी आहे. अद्यापी 50 हजार नागरिकांनी दुसरा डोस घेतलेला नाही. यामध्ये वैद्यकीयदृष्ट्या अपात्र, गर्भधारणेसाठी इच्छूकांचा समावेश आहे. 15 ते 18 वयोगटातील 68 टक्के मुलांनी कोरोनाची पहिली लस घेतली आहे. पहिल्या दिवशी केवळ 1 हजार 512 बारा लोकांनी ‘बूस्टर डोस’ (Vaccination) घेतला. हा अल्प प्रतिसाद होता.
● सध्या राज्यात तब्बल 10 हजार 139
रुग्ण सक्रिय. एकाचा मृत्यू.
● एकूण मृत्यू 3 हजार 533 एवढा आहे
● काल दिवसभर 5814 संशयित
रुग्णांच्या चाचण्या घेतल्या
● 1592 जणांना कोरोनाची लागण
53 हजार मुले लसवंत
15 ते 18 वयोगटातील 53 हजार 411 विद्यार्थ्यांनी कोरोनाची पहिली लस घेतली.
राज्यात या वयोगटातील 72 हजार 198 मुले आहेत.
01 लाख 91 हजार 501 राज्यातील नागरिकांना कोरोनाची बाधा.
01लाख 77 हजार 829 रुग्ण बरे झाले आहे.
92.86% रुग्ण बरे होण्याचे प्रमाण
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.