Revolutionary Goans | Manoj Parab Dainik Gomantak
गोवा

Manoj Parab: सिव्हील कोड, कोमुनिनाद कायदा रद्द करणार का? मनोज परब यांचा मुख्यमंत्र्यांना सवाल

मुख्यमंत्र्यांनी काय करणार ते नेमकेपणाने स्पष्ट करण्याचे आवाहन

गोमंतक ऑनलाईन टीम

Manoj Parab on Goa CM: शिवराज्याभिषेक दिनाच्या कार्यक्रमात गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोव्यावरील पोर्तुगीजांचा प्रभाव पुर्णपणे पुसून टाकणार, असे वक्तव्य केले होते. त्यावरून आता आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.

रिव्होल्युशनरी गोवन्स पक्षाचे मनोज परब यांनीही मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.

मनोज परब म्हणाले की, मुख्यमंत्री म्हणतात की त्यांना गोव्यावरील पोर्तुगीजांचा प्रभाव पुर्णतः हटवायचा आहे. पण नेमके काय काय हटवणार? हे त्यांनी नेमकेपणाने स्पष्ट केले पाहिजे. त्यांना गोव्यातील पोर्तुगीजांचा समृद्ध वारसा हटवायचा आहे का?

त्यांना पोर्तुगीजांनी दिलेले सिव्हिल कोड, कोमुनिनाद हे कायदे रद्द करायचे आहेत का? गोव्यावरील पोर्तुगीजांचा प्रभाव हटवायचा म्हणजे नेमके काय करणार हे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट करावे, असा सवाल परब यांनी केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: सभापतिपदासाठी विरोधकांतर्फे काँग्रेस पक्षाचे एल्‍टन डिकॉस्‍टा, अर्ज सादर; विजय सरदेसाई, वीरेश बोरकरांच्या अनुपस्‍थितीमुळे चर्चा

Government Job Scheme: स्‍थानिकांसाठी रोजगाराची नवी दारे, सरकार जाहीर केली 'लॉजिस्‍टिक' योजना, जाणून घ्या संपूर्ण माहिती

Dog Attack: मैदानात खेळत असताना हल्ला, फातोर्डा स्टेडियमवर दोन मुलांसह तिघांचा कुत्र्याने घेतला चावा

Goa Court Verdict: दोघांच्या परस्पर संमतीतून संबंध म्हणजे बलात्कार नव्हे! संशयित मुक्त, फास्ट ट्रॅक स्पेशल कोर्टाचा निकाल

Nepal Gen Z Protest: नेपाळ देशात आता लष्कराची हुकूमत; फ्रान्समध्येही सत्ताधाऱ्यांविरोधात असंतोष, पोलिस बळाचा वापर

SCROLL FOR NEXT