CM Pramod Sawant Delhi visit Dainik Gomantak
गोवा

पक्षश्रेष्ठींचा आशीर्वाद घेऊनच परतणार; अग्निकांड आणि ZP निवडणुकीनंतर CM सावंतांनी गाठली दिल्ली

भाजप नेतृत्वाशी झालेल्या या भेटीमुळे गोवा भाजप आणि राष्ट्रीय नेतृत्व यांच्यातील समन्वय अधिक दृढ होईल, अशी प्रतिक्रिया पक्षातील सूत्रांनी व्यक्त केली आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: बर्च बाय रोमियो लेन या हडफडेतील क्लबच्या अग्निकांडानंतर दिल्लीतील पक्षश्रेष्ठींची राज्यातील सरकारवर नाराजी असल्याची चर्चा असतानाच मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दोन्ही जिल्हा पंचायतींवर भाजपचा झेंडा फडकावल्यानंतर दिल्ली गाठली आहे. या दौऱ्यातून दिल्लीतील पक्षश्रेष्ठींचा आशीर्वाद घेऊनच ते परतणार आहेत.

या दौऱ्यातून त्यांनी पक्षांतर्गत आणि पक्षाबाहेरील विरोधकांना अवाक्षर न उच्चारता उत्तर दिले आहे. मुख्यमंत्र्यांना दिल्लीत पाचारण केले जाणार असे सांगणारे थकून गेल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी जिल्हा पंचायत निवडणुकीत भरघोस यश मिळवल्यानंतर दिल्ली दौऱ्यावर जाण्याचा निर्णय घेतला. यासाठी भाजपच्या कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती झालेले नितीन नबीन यांची सदिच्छा भेट हे निमित्त त्यांनी साधले.

सरकार आणि पक्ष संघटना यांच्यातील समन्वय भक्कम आहे हे दाखवण्यासाठी त्यांनी या दौऱ्यात भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक, प्रदेश उपाध्यक्ष अॅड नरेंद्र सावईकर, प्रदेश सरचिटणीस सिद्धार्थ कुंकळेकर आणि सर्वानंद भगत यांचा देखील समावेश केला. दाखल राजधानी दिल्लीत झाल्यानंतर लागलीच मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष नितीन नबीन यांची सदिच्छा भेट घेतली.

या भेटीदरम्यान मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी नितीन नवीन यांचे मनःपूर्वक अभिनंदन करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या बैठकीला भाजप गोवा प्रदेशाध्यक्ष दामू नाईक, भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष नरेंद्र सावईकर, राज्याचे सरचिटणीस सिद्धार्थ कुंकळेकर आणि सर्वानंद भगत हेही उपस्थित होते.

या वेळी पक्ष संघटना, आगामी राजकीय आव्हाने तसेच केंद्र व राज्यातील समन्वय अधिक बळकट करण्याबाबत चर्चा झाली. भाजप नेतृत्वाशी झालेल्या या भेटीमुळे गोवा भाजप आणि राष्ट्रीय नेतृत्व यांच्यातील समन्वय अधिक दृढ होईल, अशी प्रतिक्रिया पक्षातील सूत्रांनी व्यक्त केली आहे. भेटीमुळे सावंत समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

प्रेरणादायी राजकीय प्रवास !

नितीन नबीन यांचा प्रेरणादायी राजकीय प्रवास आणि भक्कम संघटनात्मक अनुभव पक्षासाठी निश्चितच नवीं ऊर्जा देणारा ठरेल, असे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी यावेळी नमूद केले त्यांच्या नेतृत्वामुळे भारतीय जनता पक्षाची संघटनात्मक ताकद अधिक मजबूत होईल तसेच पक्षाच्या राष्ट्रहिताच्या ध्येयांना अधिक गती मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

शिक्षण विभागाचा मोठा निर्णय! गोव्यात विद्यार्थ्यांचा प्रवास आता अधिक सुरक्षित; बस चालकांसाठी 'पोलीस व्हेरिफिकेशन' बंधनकारक

Surya Gochar 2026: 11 जानेवारीपर्यंत सूर्य देवाची विशेष कृपा! 'या' 3 राशींच्या नशिबात राजयोग; सोन्यासारखे चमकतील दिवस!

Konkan Tourism: गर्दीपासून दूर, निसर्गाच्या कुशीत! नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी कोकणातील 'ही' 5 शांत ठिकाणं आहेत बेस्ट

घराजवळ चर्च आहे का? गोव्यात घर घेतल्यानंतर अर्शद वारसीच्या सासू-सासऱ्यांनी त्याला पहिला प्रश्न काय विचारला? VIDEO

गोवा जिल्हा पंचायत अध्यक्षपदासाठी अर्ज सादर; उत्तरेत भाजपच्या रेश्मा बांदोडकर, दक्षिणेत सिद्धार्थ गावस तर काँग्रेसतर्फे लुईझा रॉड्रिग्ज रिंगणात

SCROLL FOR NEXT