CM Sawant Vs Khalap  
गोवा

CM Sawant Vs Khalap: तर म्हापसा अर्बनची फाईल पुन्हा उघडू; CM सावंतांचा नाव न घेता खलपांना गर्भित इशारा

CM Sawant Vs Khalap: आम्हाला कमरेखाली वार करायचे नाहीत. कोणत्या उमेदवाराने बेकायदा कमावलेले पैसे कुठे ठेवलेत याची साऱ्यांनाच माहिती आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

CM Sawant Vs Khalap

म्हापसा अर्बन बँकेसंदर्भातील फाईल पुन्हा उघडली जाऊ शकते, असा गर्भित इशारा काँग्रेसचे उत्तर गोव्यातील उमेदवार अ‍ॅड. रमाकांत खलप यांचे थेट नाव न घेता मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिला. हे प्रकरण सध्या सहकारी संस्था निबंधकांकडे आहे, ते संपलेले नाही. याचा विचार ज्याने त्याने जरूर करावा, असेही ते म्हणाले.

भाजप कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेवेळी विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले, म्हापसा अर्बन का बुडाली याचे पुरावे आमच्याकडे आहेत. आमच्यावर आरोप करण्यासाठी कोणी (खलप यांनी) अन्य कोणाला पुढे करू नये. जे काय म्हणायचे असेल ते थेट म्हणावे.

आम्हाला कमरेखाली वार करायचे नाहीत. कोणत्या उमेदवाराने बेकायदा कमावलेले पैसे कुठे ठेवलेत याची साऱ्यांनाच माहिती आहे. आम्ही राजकारणाचा वापर वैयक्तिक स्वार्थासाठी कधीच करत नाही.

आमच्यासाठी राष्ट्रप्रथम, नंतर पक्ष आणि सर्वात शेवटी आम्ही असतो. राजकारणातून आम्ही स्वार्थ साधला असे कोणी सिद्ध केल्यास त्याचक्षणी राजकारण सोडून घरी जाण्याची आमची तयारी आहे.

तत्पूर्वी भाजपच्या विकसित भारत 2047 संकल्प पत्राचे प्रकाशन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. त्यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, उत्तर गोव्यातील उमेदवार आणि केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक, दक्षिण गोव्यातील उमेदवार पल्लवी धेंपे आणि जलसंपदामंत्री सुभाष शिरोडकर उपस्थित होते.

म्हापसा अर्बन बुडाल्याने ज्या शेकडो लोकांचे कष्टाचे पैसै बुडाले त्यांना त्याविषयी विचारा. ते यासाठी कोण कारणीभूत ते सांगतील. लोकांच्या हक्कांचे पैसे लोकांना मिळत नाहीत त्यांच्या वेदना समजून घ्या. ठेवीदार, भाग भांडवलदार यांना पैसे मिळायला हवेत, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Beef Shortage: गोव्यातील गोमांस पुरवठा साखळीला ब्रेक, गोरक्षकांच्या कथित हल्ल्यांविरोधात महाराष्ट्र कर्नाटकात संप!

Krishna Janmashtami 2025 Wishes In Marathi: 'कृष्ण' जन्मला ग बाई... जन्माष्टमीनिमित्त मित्रपरिवाराला पाठवा 'या' गोड, नटखट शुभेच्छा

Krishna Janmashtami 2025: कृष्ण जन्माष्टमीचा शुभ योग; 'या' 3 राशींवर राहिल श्रीकृष्णाची कृपा, परदेश प्रवासाचीही सुवर्णसंधी

Goa Rain Update: गोव्यात पाच दिवस मुसळधार पावसाची शक्यता; हवामान खात्याकडून ‘यलो अलर्ट’

ED Raid: कर्नाटक ते गोवा, मुंबई, दिल्लीत... ईडीचे छापे, काँग्रेस आमदाराच्या घरातून 1.68 कोटी रोख आणि 6.75 किलो सोने जप्त

SCROLL FOR NEXT