लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरु झाल्या आहेत. प्रत्येक राजकीय पक्ष एकमेकांची उणीधुणी काढण्यात व्यग्र आहेत, तसेच विकासाठी आमचाच उमेदवार प्रबळ असल्याचा दावा देखील करत आहेत.
अशात गोव्याच्या राजकारणात विविध राजकीय नेत्यांना दिलेल्या उपमा सध्या चर्चेचा आणि तितकाच वादाचा देखील विषय ठरत आहे. गेल्या काही दिवसांत राज्यात कटाप्पा, सरडा, लापीट आणि घाबरट यासारखे शब्द राजकीय नेत्यांच्या तोंडून बाहेर पडत आहेत.
विरोधीपक्षनेते युरी आलेमाव यांनी लापीट हा शब्द मांद्रेचे आमदार जीत आरोलकर यांना उद्देशून वापरल्याचा आरोप भाजपने केला. यावरुन मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी काँग्रेसच्या आणीबाणीपर्यंतचा इतिहास काढत विरोधकांची भाषा अयोग्य असल्याची टीका केली.
भंडारी समाजाने देखील याची दखल घेत आलेमाव यांच्याकडून माफीची मागणी केली. दरम्यान, आलेमाव यांनी माफी मागितली पण, ते कोणाला उद्देशून बोलले नसल्याचा खुलासा देखील त्यांनी केला.
यावरुन गोवा फॉरवर्डचे आमदार सरदेसाई यांनी लापीट हा शब्द सामान्य असल्याचे म्हणत त्याचा अर्थ ‘मस्तखोर’ असा होतो. शिवाय भाजप सरकारच लापीट आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.
विजय सरदेसाई यांनी इंडिया आघाडीच्या उमेदवारांना समर्थन दिले आहे. सरदेसाई यांनी माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत आणि विद्यमान मंत्री सुदिन ढवळीकर यांच्यावर सडकून टीका केली. सरदेसाई यांनी कामत यांना घाबरट तर ढवळीकरांना गोव्याच्या राजकारणातील सरडा अशी उपमा दिली.
दिगंबर कामत घाबरट असल्यामुळे गोमन्तकीयांपासून पळ काढत आहेत. तर, सुदिन ढवळीकर मंत्रीपदाची खुर्ची वाचविण्यासाठी भाजप सांगेल ते बोलत आहेत. ढवळीकर गोव्याच्या राजकराणातील सरडा आहेत, त्यांचे मंत्रीपद सुरक्षित नसून, लोकभेनंतर त्यांना बाहेरचा रस्ता दाखवला जाईल, अशा शब्दात सरदेसाई यांनी कामत आणि ढवळीकर यांच्यावर टीका केली.
विजय सरदेसाई यांनी रिंव्हॉल्युशनरी गोवन पक्षावर देखील टीका करत, तो पक्ष मशनरी असल्याचा आरोप केला. यावर उत्तर देताना विरेश बोरकर यांनी सरदेसाई कटाप्पा असल्याची टीका केली.
सरदेसाई यांनी एकेकाळी काँग्रेसचा पाठिंबा काढून मनोहर पर्रीकर यांना समर्थन देऊन काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसला होता होता, असे बोरकर म्हणाले.
भाजप, काँग्रेसच्या उमेदवारांनी अनुक्रमे मंगळवार आणि बुधवारी अर्ज दाखल केल्यानंतर आज (गुरुवार) आरजीच्या दोन्ही उमेदवारांनी अर्ज दाखल केल्यानंतर बोरकरांनी माध्यमांशी संवाद साधला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.