BJP
BJP Dainik Gomantak
गोवा

गोव्यात भाजपला विरोधकांचं तगडं आव्हान?

दैनिक गोमन्तक

मडगाव: सत्ताधारी भाजपला पराभूत करण्यासाठी सर्व विरोधी गटाने एकत्र यावे, असे आवाहन गोवा फॉरवर्ड पक्षाचे सर्वेसर्वा विजय सरदेसाई यांनी काल केले होते. त्यांनी काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, मगो आणि आप यांना जाहीर आवाहन केले होते. (Will opposition parties form a coalition to fight against BJP)

याला आज तृणमूल काँग्रेसकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून भाजपला पराभूत करण्यासाठी आम्ही केव्हाही तयार आहे, असा संदेश पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांच्या कार्यालयाकडून मिळाला असल्याची माहिती तृणमूलच्या (TMC) प्रभारी महुआ मोईत्रा यांनी ट्विटद्वारे करून दिली आहे. यावर सत्ताधारी भाजपाने अशा आघाडीचे प्रयत्न म्हणजे केवळ वैफल्यग्रस्तपणा लपविणे आहे, असे म्हटले आहे.

अर्थात यात राष्ट्रीय पक्ष असलेल्या काँग्रेसकडून अद्यापही कसल्याही प्रकारचा सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही. याशिवाय 'आप'ने अद्यापि आपले पत्ते जाहीर केलेले नाहीत पण भाजपला पराभूत करण्यासाठी मतांचे विभाजन टाळणे अत्यावश्यक असून विरोधकांनी एकत्रित आल्यावरच ते शक्य आहे असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.

आत्ता महाआघाडीबाबत सरदेसाई, मोईत्रा यांच्या विचारातून पुन्हा चित्र बदलण्याचे संकेत मिळत आहे. कदाचित येत्या काही दिवसात मगोसुद्धा महाआघाडीबाबात निर्णय घेण्याची शक्यता आहे. त्याबाबत चर्चा सुरू आहे, अशी माहिती सूत्रांकडून कळते. काल विजय सरदेसाई (Vijay Sardesai) यांनीही असेच आवाहन केले होते. येनकेन प्रकारेण अगदी रडीचा डाव खेळूनही भाजप सत्तेवर येण्याचा प्रयत्न करेल, अशा परिस्थितीत विरोधी पक्षांची तोंडे चार दिशांना वेगळी राहिल्यास मत विभागणीचा फायदा घेऊन भाजप सत्तेवर येईल, तसे झाल्यास गोव्याचा विनाश हा अटळ आहे. हा विनाश टाळायचा असेल, तर मी आधी सांगितल्या प्रमाणे 'टीम गोवा' ही संकल्पना डोळ्यासमोर ठेवून भाजपच्या विरोधात संघटित टक्कर देणे गरजेचे आहे, असे त्यांनी म्हटले होते.

जागा वाटप
तृणमूल काँग्रेस-मगो आणि काँग्रेस-गोवा फॉरवर्ड यांची युती झाली असली, तरी जागावाटप निश्चित झाले नाही. तर महाआघाडी झाल्यास जागा वाटपचा तिढा आणखी गुंतागुंतीचा होणार आहे. काँग्रेस आणि गोवा फॉरवर्ड युतीत अजूनही जागा निश्चित होत नाही. काँग्रेसने आपली पहिली यादी जाहीर केली आहे. गोवा फॉरवर्डने आपले दोन उमेदवार जवळपास निश्चित केले आहे. अजून तृणमूल-मगो यांचे उमेदवार जाहीर झालेले नाही. त्यामुळे महाआघाडी झाल्यास जागा वाटपावरून पक्षांमध्ये वाद होण्याची शक्यता आहे.

सर्व विरोधी पक्ष एकत्र येऊन भाजपच्या विरोधात महाआघाडी करावी की नको याचा निर्णय आम्ही नव्हे तर आमचे पक्षश्रेष्ठींनी घ्यायचा आहे. ते जो निर्णय घेतात तो आम्हाला मान्य असेल.
- दिगंबर कामत, काँग्रेस विधीमंडळ नेते


भाजपला हरवण्यासाठी आम्ही कोणत्याही गोष्टीला तयार आहोत. यापूर्वी पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसने ते करून दाखवले आहे आणि गोव्यातही आम्ही यासाठी तयार आहोत.
- महुआ मोईत्रा, गोवा प्रभारी तृणमूल काँग्रेस

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Imran Khan Comeback: इम्रान खान नऊ वर्षांनंतर करणार कमबॅक, गोव्यात शूटिंग सुरू; आमिरचा कॅमिओ

Goa Today's Live News Update: ताळगाव ग्रामपंचायत निवडणूक, मोन्सेरात पॅनल विजयी

Sattari Farmer : काजूला २५० रु. आधारभूत किंमत द्या : सत्तरीतील बागायतदार

Highest FD Interest Rates: FD धारकांसाठी आनंदाची बातमी, PPF-सुकन्या समृद्धी पेक्षा 'या' बँका देतायेत जास्त व्याजदर

Gram Panchayat Karapur : कारापूर-सर्वण ग्रामपंचायत पर्यायी जागेच्या शोधात

SCROLL FOR NEXT