Utpal Parrikar  Dainik Gomantak
गोवा

डिचोलीतून निवडणूक लढवणार नाही: उत्पल पर्रीकर

फडणवीस यांच्या या विधनानानंतर भाजपने उत्पल पर्रीकर यांना डिचोलीमधून तिकिट देण्याची तयारी दाखवली आहे.

दैनिक गोमन्तक

पणजी: उत्पल पर्रीकर यांना पणजीमधून भाजपची उमेदवारी मिळणार का? या प्रश्नाला आज अखेर पूर्णविराम लागला. भाजपने गोवा विधानसभा निवडणुकीसाठी जाहीर केलेल्या पहिल्या उमेदवार यादीतून उत्पल पर्रीकर (Utpal Parrikar) यांचा पत्ता कट केला आहे. पणजीची उमेदवारी बाबूश मोन्सेरात यांना देण्यात आली. (Utpal Parrikar Latest News updates)

दरम्यान, उत्पल पर्रीकर यांना भाजपने (BJP) 2 जागांची ऑफर देखील दिली आहे. गोवा भाजप निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी याबद्दल माहिती दिली. ते म्हणाले, उत्पल पर्रीकर यांना पक्षाने 2 'ऑप्शन' दिले होते. त्यातील एक जागा त्यांनी अमान्य केली आहे. दुसऱ्या जागेबद्दल बोलणी सुरू आहे. मी आशा करतो की ही बोलणी सफल होईल. आम्ही सर्वजण पर्रीकर कुटुंबाचा आदर आणि सन्मान करतो.

फडणवीस यांच्या या विधनानानंतर भाजपने उत्पल पर्रीकर यांना डिचोलीमधून तिकिट देण्याची तयारी दाखवली आहे, अशी माहिती समोर येत आहे. डिचोलीचे विद्यमान आमदार आणि गोवा विधानसभेचे अध्यक्ष राजेश पाटणेकरांची सीट आहे. पाटणेकर निवडणूक लढण्यास इच्छुक नसल्याचं सांगण्यात येत आहे.

मात्र, भाजपची ऑफर उत्पल पर्रीकर यांनी काही वेळातच धुडकावून लावली. पणजी (Panaji) मधूनच निवडणूक लढणार असल्याचे स्पष्ट करत ते म्हणाले, मी माझ्या पर्यायांचा विचार केलेला आहे. माझ्या नावाची डिचोली मतदारसंघातून भाजप उमेदवारीसाठी चर्चा सुरु असेलही पण मला डिचोलीतून निवडणूक लढविण्याची अजिबात इच्छा नाही आणि मी डिचोलीतून लढणारही नाही.

उत्पल पर्रीकर यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. भाजप पर्रिकर यांची मनधरणी करण्यात सफल होणार? का या राजकीय परिस्थितीचा फायदा घेऊन भाजप विरोधी पक्ष त्यांना फितवणार, हे लवकरच स्पष्ट होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT