पणजी: गोवा तृणमूल कॉंग्रेसच्या प्रभारी महुआ मोईत्रा यांनी काँग्रेस आणि गोवा फॉरवर्डसोबत संभाव्य युतीचे संकेत दिले आहेत. आगामी गोवा विधानसभा निवडणुकीत आपली छाप सोडण्यासाठी व भाजपला दणका देण्यासाठी तृणमूल कॉंग्रेस, काँग्रेस आणि गोवा फॉरवर्डसोबत जाण्याची शक्यता आहे. (TMC Latest News)
महुआ मोईत्रा (Mahua Moitra) म्हणाल्या, गोव्यात भाजपचा (BJP) पराभव करण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करू. यासाठी गोवा फॉरवर्ड पार्टी (Goa Forward Party), काँग्रेस, तृणमूल कॉंग्रेस आणि मगो पार्टी (MGP) एकत्रित येऊ शकतात. ममतांनी भूतकाळात हे केले आहे आणि त्या ते आताही करू शकतात.
महुआ मोईत्रा यांच्या या विधानानंतर गोवा फॉरवर्ड पार्टी, मगो पार्टी (MGP), तृणमूल कॉंग्रेस (TMC) आणि काँग्रेस पक्षांच्या युतीच्या चर्चेला उधाण आले आहे. भाजपला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी तृणमूल कॉंग्रेस राजकीय पटलावर कोणते डाव पेच खेळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मतदारांना आकर्षित करण्यासाठी तृणमूल कॉंग्रेसचे प्रयत्न सुरू आहेत. याचाच एक भाग म्हणून त्यांनी युवा शक्ति कार्ड योजना जाहीर केली आहे. या कार्ड वरून लोकाना कर्ज स्वरूपात 20 लाखापर्यंन्त रक्कम मिळू शकते आणि याचा व्याज दर केवळ 4% असणार आहे. 18 ते 45 या वयोगटातील सुमारे 7.5 लाख नागरिकांना या (TMC) योजनेचा लाभ घेता येणार आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.