Goa CM Dr. Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

Goa CM Pramod Sawant: गोव्याचे मुख्यमंत्री राष्ट्रीय राजकारणात एन्ट्री करणार? काय म्हणाले प्रमोद सावंत?

Goa Politics: गोवा हे छोटे राज्य असून येथेच ते आनंदी असल्याचे सावंत यांनी यावेळी सांगितले.

Pramod Yadav

मुंबई: माजी संरक्षण मंत्री आणि दिवंगत भाजप नेते मनोहर पर्रीकर यांच्याप्रमाणे गोव्याचे विद्यमान मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत राष्ट्रीय राजकारणात प्रवेश करणार का? अशा चर्चा सध्या सुरु आहेत. याबाबत त्यांना एका हिंदी वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत प्रश्न विचारण्यात आला. सावंत यांनी या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी भविष्यातील त्यांच्या राजकीय योजनांची माहिती देखील दिली.

मुख्यमंत्री सावंत शुक्रवारी (२१ फेब्रुवारी) ABP नेटवर्कच्या आयडियाज ऑफ इंडिया समिट 2025 या विशेष कार्यक्रमात सहभागी झाले होते. यावेळी त्यांना गोवा, देश, कुंभमेळा यासह विविध विषयावर भाष्य केले. मुख्यमंत्री सावंत यांना दिल्लीच्या राजकारणात प्रवेश करायचा आहे का?, असा प्रश्न विचारण्यात आला. गोवा हे छोटे राज्य असून येथेच आनंदी असल्याचे सावंत यांनी यावेळी सांगितले.

माजी संरक्षण मंत्री आणि दिवंगत भाजप नेते मनोहर पर्रीकर यांचे राष्ट्रीय राजकारणात मोठे नाव होते, याबाबत बोलताना सीएम सावंत म्हणाले की, ते एक महान नेते होते. गोव्यासारख्या छोट्या राज्याचे नेतृत्व करणे ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे. राज्यात अजून विकास व्हायचा आहे, असे सावंत म्हणाले.

"गेल्या 10 वर्षात गोव्यात खूप काम आणि विकास झाला आहे. गोव्यात गेल्या पाच वर्षांत पायाभूत सुविधांवर खूप काम झाले आहे. गोवा हा स्वतःच एक ब्रँड आहे आणि त्याला कोणत्याही आंतरराष्ट्रीय ब्रँडची गरज नाही."

प्रमोद सावंत पुढे म्हणाले, "गोव्यात फक्त समुद्र आणि चर्च आहेत, असे लोकांना वाटायचे. मला विचारण्यात आले की गोव्यात मंदिरे नाहीत का? मी त्यांना सांगायचो की गोव्यात ७० टक्के लोकसंख्या हिंदू आहे आणि इथे ऐतिहासिक मंदिरे आहेत. आता लोक गोव्याला भेटायला येतात तेव्हा ते चर्चसह मंदिरांनाही भेट देतात."

महाकुंभाबाबत बोलताना सावंत म्हणाले, 'मीही महाकुंभात पवित्रस्नान करून आलो आहे. तेथे 50 कोटींहून अधिक लोकांनी स्नान केले आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उत्तम व्यवस्था केली आहे आणि असे असतानाही काही दु:खद घटना घडल्या ज्या घडायला नको होत्या. विरोधी पक्षातील जे तिकडे गेले नाहीत, त्यांना काय व्यवस्था आहे हे कसे कळणार? अजून काही दिवस बाकी आहेत, जाऊन स्नान करा, असे सावंत म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pooja Naik: सरकारी नोकऱ्या गुणवत्तेनुसारच दिल्‍या गेल्या! 'कॅश फॉर जॉब' आरोपांना चौकशी अहवालानंतर उत्तर, ढवळीकरांचं स्‍पष्‍टीकरण

91.45% गोमंतकीयांचा टेलिफोनला 'बाय बाय'! वापरकर्त्यांची संख्‍या 1.32,261 वरून 11,314

Goa Politics: विरोधकांच्‍या युतीचे भिजत घोंगडे कायम! काँग्रेसची होणार बैठक; मनोज परब, वीरेश बोरकर यांच्‍या दिल्ली दौऱ्यावरून प्रश्‍‍नचिन्‍ह

IFFI 2025: इफ्फीत 'फॅशन शो'मधून हस्तकलेचा ग्लॅमरस प्रचार! महाराष्ट्रीयन अभिनेत्री सायली पाटीलसह दिग्गज मॉडेल्स उतरल्या रॅम्पवर

Baina Robbery Case: पोलिसांच्या अकार्यक्षमतेची लक्तरे, 6 दिवस उलटूनही बायणा येथील सशस्त्र दरोड्याचा तपास लागेना

SCROLL FOR NEXT